Beed Crime: बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असतानाच आणखी एक भयानक हत्याकांड उघडकीस आले आहे. बीडमधील आष्टीत विकास बनसोडे नामक तरुणाचा अमानुष मारहाणीत मृत्यू झाला आहे. ट्रक चालकानं दोन दिवस डांबून मारल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या भावानं केला आहे .बीडमधील क्षीरसागर आणि बनसोडे कुटुंबाच्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
आरोपी ट्रक मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात भाऊसाहेब क्षीरसागर याच्यासह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात भाऊसाहेब क्षीरसागर याला पोलिसांनी अटक देखील करण्यात केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. मृत तरुणाचे ट्रक मालकाच्या मुलीसह प्रेमसंबध होते. यातूनच ही केल्याचा संशय आहे.
विकास याचे क्षीरसागर याच्या मुलीशी प्रेम संबंध असल्याचा संशय आल्याने भाऊसाहेब आणि त्याच्या इतर दहा साथीदारांनी विकासला दोरी आणि वायरने बेदम मारहाण केली.. यात विकासचा मृत्यू झाला. तर आष्टीतील ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी तत्काळ घटनेची दखल घेण्याची मागणी पँथर सेनेचे प्रमुख दीपक केदार यांनी केली आहे.
बीडमधील क्षीरसागर आणि बनसोडे कुटुंबाच्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी इथे विकास बनसोडे या तरुणाचा अमानुष मारहाणीत मृत्यू झाला. क्षीरसागर या ट्रक चालकानं 2 दिवस डांबून ठेवून केलेल्या मारहाणीत विकास बनसोडे याचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय. त्यानंतर ट्रकचालक क्षीरसागरने विकास बनसोडेच्या आई-वडिलांना बोलावून घेतलं. त्याची ऑडिओ क्लिप झी २४ तासच्या हाती आली आहे. मात्र झी २४ तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
यामध्ये क्षीरसागर हा बनसोडे यांच्या आई वडिलांना तुम्ही नवरा बायको लवकर या.. जे कोणी असतील त्याला घेऊन या.. इकडे आल्यावर तुम्हाला पराक्रम सांगतो.. अर्जंट मध्ये या टाईमपास करू नका तुमचा लेक माझ्याकडे आहे.. तुम्ही लवकर माझ्या घरी या असे सांगतो.. यावर विकासची आई माझ्या पोराला जी काही मारहाण झाली असेल ती झाली असेल.. पण आता त्याला मारू नका.. आम्ही येऊ पर्यंत हात लावू नका असे म्हणते.. ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे.