Beed News : देशमुखांप्रमाणेच अपहरणकांड; बसमध्ये शिरुन तरुणाचं अपहरण अन् ...

बीड जिल्हा पुन्हा एकदा दुष्कर्माने हादरलं आहे. संतोष देशमुख प्रकरण चर्चेत असताना आणखी एका व्यक्तीला अपहरण करुन जबर मारहाण करण्यात आलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 15, 2025, 07:06 PM IST
Beed News : देशमुखांप्रमाणेच अपहरणकांड; बसमध्ये शिरुन तरुणाचं अपहरण अन् ...

बीड जिल्हा पुन्हा एकदा चुकीच्या बातमीने चर्चेत आलं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यातच नव्हे तर देशात चर्चेता विषय बनला आहे. असं असताना एका तरुणाचं अपहरण करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने पुन्हा एकदा बीड हादरलं आहे. 

बीड वरून एसटी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण करून अमानुष मारहाण करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरात घडली असून मारहाण करण्यात आली आहे. चार आरोपी विरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना पोलिसांनी cctv च्या मदतीने ताब्यात घेतले तर अन्य एक जण फरार आहे

बीडवरुन अंबाजोगाईला जाणाऱ्या बसमध्ये थुंकल्याच्या कारणावरुन एका महिलेशी वाद झाला. यानंतर ही बस अंबाजोगाई शहरात पोहचताच चारजणांनी बसमध्ये घुसत विद्यार्थ्यासह त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी वाहक व चालकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे न ऐकता या चौघांनी या दोघांना खाली उतरवत मारहाण सुरुच ठेवली.

या मारहाणीत संदेश सावंत हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एसआरटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात ऋषी शिंदे, लखन जगदाळे, निकेश जगदाळे, बालाजी जगदाळे या चौघांविरोधात कलम 109,104(1),115(2),352, 351(2),351(3),3(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे