बीडमध्ये पुन्हा खळबळ! पवनचक्की कंपनीच्या बाहेर गोळीबाराचा थरार! एकाचा मृत्यू

बीडमध्ये पुन्हा गोळीबार झालाय. पवनचक्कीच्या सुरक्षा रक्षकाने गोळीबारी केलाय. या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय. 

वनिता कांबळे | Updated: May 23, 2025, 05:13 PM IST
बीडमध्ये पुन्हा खळबळ! पवनचक्की कंपनीच्या बाहेर गोळीबाराचा थरार! एकाचा मृत्यू

Beed Crime News : बीडमध्ये पुन्हा गोळीबार झाला आहे. पवनचक्कीच्या सुरक्षा रक्षकाने गोळीबारी केला आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. चोरीच्या उद्देशाने काही तरुण पवनचक्की परिसरात शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकानं गोळीबार केला आहे. नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली.

बीडच्या लिंबागणेशच्या महाजनवाडी परिसरात गुरुवारी रात्री पवनचक्की कंपनीच्या परिसरात चोरीसाठी आलेल्या चोरट्यांवर सुरक्षारक्षकाने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात एकाचा मृतदेह परिसरात आढळला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही. 

बीडच्या लिंबागणेशच्या महाजनवाडी  परिसरात गुरुवारी रात्री पवनचक्की कंपनीच्या परिसरात चोरीसाठी आलेल्या चोरट्यांवर सुरक्षारक्षकाने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात एकाचा मृतदेह परिसरात आढळला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

लिंबागणेश परिसरातील महाजनवाडी येथील एका खासगी पवनचक्की कंपनीच्या मालकीच्या साहित्याची चोरी करण्यासाठी काही अज्ञात चोरटे रात्रीच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले होते. सुरक्षारक्षकाने त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न करताच, त्याने इशारा देऊन चोरट्यांच्या दिशेने गोळीबार केला. गोळीबार झाल्यानंतर चोरटे घाबरून पळून गेले. तर यात एकाचा मृतदेह सापडला आहे.  घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, परिसराची पाहणी करून अधिक तपास सुरू केला आहे.

दिव्यांग ग्रामसेवकाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल  चिखली तालुक्यातील असोला बु येथे पंतप्रधान आवास योजनेचा सर्व्हे करणाऱ्या दिव्यांग ग्रामसेवक संतोष सवडतकर यांना मारहाण झाल्याची घटना 22 मे रोजी सकाळी घडली. आरोपी जाफर खा आमद खा याने सवडतकर यांच्या मोटारसायकलला धक्का देऊन खाली पाडले, शिवीगाळ केली आणि कॉलर पकडून गल्लीत लोटले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, ग्रामसेवक संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

सवडतकर हे गावातील अपात्र घरकुल लाभार्थ्यांचे पंतप्रधान आवास योजनेचे सर्वेक्षण करत होते. यापूर्वी गावातील घाण पाण्याच्या तक्रारीवरून झालेल्या चौकशीमुळे आरोपीचा राग असल्याचे तक्रारीत नमूद आहे. मारहाणीची तक्रार अंढेरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष भगवान डोंगरदिवे यांनी सवडतकर यांना पोलिस ठाण्यात नेले. आरोपीविरुद्ध बीएनएस कलम 132,115(2), आणि 351 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बीड जिल्ह्यातील नाळवाडी ग्रामपंचायतीमध्ये विविध शेती कामासाठी आलेल्या ग्रामस्थांकडून पैशाची मागणी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत नागरिकाला अधिकारी सरळ सरळ सांगितले की, “पैसे उसने घ्या, पण आम्हाला द्या”, असा दबाव शेतकऱ्यांवर आणण्यात आला.

हा प्रकार म्हणजे ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकतेचा अभाव आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचे उदाहरण आहे. सरकारी पातळीवर निधी उपलब्ध असतानाही, गावकऱ्यांकडून व्यक्तिगत स्वरूपात पैसे मागितले जात असल्याचे उघड झाले आहे. 

संतप्त शेतकऱ्यांनी ग्रामसेवकाचा व्हिडिओ तयार करून प्रशासकीय कामकाजाचा बुरखा फाडला आहे. पैसे घेणाऱ्या ग्रामसेवकाचे नाव शकील सय्यद असे आहे. दरम्यान ग्रामसेवकाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. ग्रामसेवक पैसे घेतानाचा व्हिडिओ आता सोशल माध्यमात तेजीने व्हायरल झाला आहे.