Beed Lok Sabha Nivadnuk Result 2024 :  बीडमधून भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर होत्या. पण आता मात्र त्या पिछाडीवर आहेत. पंकजा यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे सध्या आघाडीवर आहेत. पंकजा मुंडे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. यापूर्वी याच मतदार संघातून प्रीतम मुंडे खासदार होत्या. सुरुवातीच्या कलांमध्ये पंकजा मुंडे 532 मतांनी पिछाडीवर आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे या खासदार आहेत. तर, पंकजा मुंडे या पहिल्यांदा लोकसभेसाठी निवडणुक लढवत आहेत. 2019मध्ये प्रीतम मुंडे या जागेवर विजयी होऊन खासदार झाल्या होत्या. त्यांना एकूण 6,78,175 मते मिळाली होती. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना 2019मध्ये 5,09,807 मतांवर समाधान मानावं लागलं होतं.  प्रीतम मुंडे यांनी सोनावणे यांचा 1,68,368 मतांनी पराभव केला होता. 


बीड मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघावर सुरुवातीपासूनच भाजपची मजबूत पकड आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे बीड मतदारसंघावर वर्चस्व होते. त्यांच्या निधनानंतरही मुंडे कुटुंबाने हा मतरदारसंघावर वर्चस्व कायम ठेवले. 2014 आणि 2019मध्ये प्रीतम मुंडे यांनी बीडमधून विजय मिळवला होता. मात्र, यंदा त्यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली. 


सविस्तर वृत्त लवकरच