बीडमध्ये नेमक चाललंय काय? आणखी एका आमदाराच्या PA कडून सेल्स मॅनेजरला मारहाण, व्हिडिओ Viral

Beed News : बीडमधून आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर. शोरुममध्ये आमदारांचा पीए आणि कार्यकर्ते येताच... पुढे घडलेल्या सर्व घटना कॅमेरात कैद.   

Updated: Mar 10, 2025, 12:05 PM IST
बीडमध्ये नेमक चाललंय काय? आणखी एका आमदाराच्या PA कडून सेल्स मॅनेजरला मारहाण, व्हिडिओ Viral
Beed updates crime news sandeep kshirsagar pa beating to showroom sales manager video viral

विकास माने, झी मीडिया, बीड; (Beed News) संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधून अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना उघडकीस आल्या आणि महाराष्ट्रातील या भागात नेमकं काय सुरुय? हाच चिंतातूर प्रश्न समाजातील अनेक स्तरांतून उपस्थित करण्यात आला. एकिकडे बीडमधून आमदार धनंजय मुंडे, आमदार सुरेश धस यांच्या संपर्कात असणारी काही नावं या गुन्हेगारी विश्वातील संपर्कांमुळं चर्चेचा विषय ठरत होतीच. त्यात आता आणखी एका आमदारांचा समावेश झाला असून, त्यांच्याही एका निकटवर्तीयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएचा व्हिडिओ व्हायरल 

बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे पीए आणि कार्यकर्ते यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खाजगी पीए सतीश शेळके आणि आणि कार्यकर्ते एका गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी शोरूम मध्ये गेले होते. या दरम्यान झालेल्या वादातून ते सेल्स मॅनेजरला मारहाण करताना दिसत आहेत. 

सदरील व्हिडिओ 12 डिसेंबर 2024 चा असून सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आता वायरल होत आहे. सतीश शेळके आमदार संदीप क्षीरसागर यांचे खाजगी पीए असून, सतीश शेळके आणि काही कार्यकर्ते बीड मधील शोरूम मध्ये गेले होते. याच शोरूम मध्ये गाडीची डिलिव्हरी घेताना सेल्स मॅनेजर त्यांना उद्धट बोलला त्यामुळे आमदारांच्या पीएना राग अनावर झाला आणि ते मॅनेजरच्या अंगावर धावून गेले. 

हेसुद्धा वाचा : लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार? अजित पवार अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा करणार?

जवळपास साडेतीन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या पीएची दहशत दिसून येते आहे. नंतर शोरूम मॅनेजर सतीश शेळके यांची माफी मागताना देखील दिसून येतो आहे. सध्या सरपंच देशमुख हत्या प्रकरणा वरून धनंजय मुंडे यांची कोंडी करणाऱ्या बीड मधील आमदारांसंबंधी व्हिडिओ समोर येत आहेत. आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता संदीप क्षीरसागर यांच्या पीएचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ज्यांनी मारहाण केली ती माझे माणसं नाहीत 

दरम्यान, क्षीरसागर यांनी या घटनेवर 'ज्यांनी मारहाण केली ती माझे माणसं नाहीत' अशी प्रतिक्रिया दिली. 'ते लोक मारायला होते की वाचवायला होते हे तपासायला हवे. व्हिडीओतील तो कार्यकर्ता माझा नाही. जुने व्हिडीओ काढले जातायेत. बीडच्या मुलांना रेंट ने रुम मिळणं अवघड होऊन बसलंय', असं ते म्हणाले. 

(हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून झी 24 तास त्याची पुष्टी करत नाही.)

About the Author