डॉक्टर बनण्याचे स्वप्न अतिवृष्टीमुळे उद्धवस्त, बीडच्या विजय राठोडला 'येथे' पाठवा आर्थिक मदत!

Beed Vijay Rathod :  यंदा आलेल्या अतिवृष्टीमुळे कपाशीचं पीक वाहून गेलंय. त्यामुळे पुढील शिक्षणाचं काय होणार याची चिंता विजयला सतावतेय.

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 18, 2025, 04:59 PM IST
डॉक्टर बनण्याचे स्वप्न अतिवृष्टीमुळे उद्धवस्त, बीडच्या विजय राठोडला 'येथे' पाठवा आर्थिक मदत!
विजय राठोड

Beed Vijay Rathod : यंदाचा पाऊस मराठवाड्याच्या मुळावर उठला होता अनेकांची स्वप्न या पावसामुळे झालेल्या चिखलात रुतले आणि उद्ध्वस्त झाले अनेक संसार उघड्यावर पडले, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पुरता बोजवारा उडाला, यातच बीड जिल्ह्यातील विजय राठोड सुद्धा भरडला गेलाय, आता त्याला गरज आहे आर्थिक आधाराची,  त्याच्या पाठीशी उभं राहून फक्त लढ म्हणा ही ताकद देण्याची.

Add Zee News as a Preferred Source

विजय राठोड हा बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकतोय. डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगूनं त्यानं छत्रपती संभाजी नगर गाठलं.  बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यतील कौडगाव घोडा हे त्याचं मूळ गाव. दोन एकर शेतीतून मिळणा-या उत्पन्नातून आणि इतरांच्या शेतात काम करून कुटुंबीय त्याच्या शिक्षणाचा खर्च भागवत होते. .मात्र यंदा आलेल्या अतिवृष्टीमुळे कपाशीचं पीक वाहून गेलंय. त्यामुळे पुढील शिक्षणाचं काय होणार याची चिंता त्याला सतावतेय.

शेतक-याच्या मुलाचं शिक्षण थांबू नये यासाठी तुम्ही विजय राठोडला मदत करू शकता. त्याच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत करू शकता. 

 
विजय साहेबराव राठोड
बँक खातं क्रमांक-  8007139489-1
Ifsc code : MAHG0004540
बँक- महाराष्ट्र ग्रामीण बँक
शाखा- शिरसाळा, बीड
GPAY- 9322126432

विजयला  पुढील  शिक्षणसाठी आधाराची गरज आहे.  तुम्ही साथ दिल्यास अत्यंत गरीब कुटुंबातील तरुणाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही त्याला सढळ हातानं मदत करा येवढचं झी 24 तासचं आवाहन.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More