'पालकमंत्रिपदासाठी हपापले, आर्थिक घोटाळे उघड करु', राष्ट्रवादीच्या धमकीला गोगावलेंचे प्रत्युत्तर, 'तोंड काळं...'

Bharat Gogawale on NCP Alligation:  गोगावलेंवर ठाकरेंची शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीका होतेय. राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातायत. 

प्रविण दाभोळकर | Updated: Jun 15, 2025, 03:47 PM IST
'पालकमंत्रिपदासाठी हपापले, आर्थिक घोटाळे उघड करु', राष्ट्रवादीच्या धमकीला गोगावलेंचे प्रत्युत्तर, 'तोंड काळं...'
भरत गोगावले

Bharat Gogawale on NCP Alligation: मंत्री भरत गोगावले यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात ठाकरेंची शिवसेना ते पालकमंत्री पदाच्या वादापर्यंत सर्व विषयावर रोखठोक भाष्य केले. यानंतर गोगावलेंवर ठाकरेंची शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीका होतेय. राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातायत. या सर्वांवर भरत गोगावलेंनी प्रत्युत्तर दिलंय. काय म्हणाले भरत गोगावले? सविस्तर जाणून घेऊया. 

काय म्हणाले होते गोगावले?

झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी अनेक गौप्यस्फोट केला आहेत. सुनील तटकरे यांनी मला पाडण्यासाठी 100 टक्के प्रयत्न केला असा धक्कादायक आरोप गोगावले यांनी लावला. सुनील तटकरे यांनी आम्हाला पाडण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींशी सेटलमेंट केली आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना पाडण्यासाठी शेकापचे जयंत पाटील यांच्याशी हातमिळवणी केली. माझ्यासाठीसुध्दा सुनील तटकरेंनी विरोधकांशी हातमिळवणी केली होती, असा आरोप भरत गोगावले यांनी केला आहे. झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात भरत गोगावले यांनी सांगितलं की, 'ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं आणि महाराष्ट्र आम्ही तुमची एकच सीट निवडून दिली, एवढं सगळं असताना. सगळीकडे पडझड होत असताना आम्ही जर पूर्ण ताकदीने साम दाम दंड भेद सगळ्या सहीत जर आम्ही मदत केली असेल मग आमच्या अपेक्षा का नसाव्यात. त्यांनी का मोठं मनं करु नयेत? हा त्यातील मतीत अर्थ. बाकी काही नाही आहे.' 

Exclusive : 'सुनील तटकरेंनी मला पाडण्यासाठी...'; भरत गोगावले यांचा गौप्यस्फोट, म्हणाले 'त्यांनी मोठं मनं ...'

'तुम्ही त्यांना मदत केली...'

गोगावले पुढे म्हणाले की, सुनील तटकरे यांनी त्यांना 100 टक्के पाडण्याचा प्रयत्न केला. त्याच कारण ही माझी चौथी टीम आहे. 230 ग्रामपंचायती माझ्या मतदारसंघात मोडतात. त्या सगळ्याच्या सगळ्या मी कागदावरती न बघता आम्ही तोंड पाठ सांगू शकतो. ग्रामपंचायती तर सांगेलच, ग्रामपंचायतीत येणाऱ्या गाव, 5 गाव, 7 गाव, 12 गाव यांची नावं देखील सांगू शकतो. त्याच कारण आमचा तसा टर्च आहे. आमचं सामान्य लोकांशी जास्त टर्च असल्यामुळे लोकांनी आम्हाला चौथा वेळी निवडून दिलं. तेही चढा क्रमांकाने. मी जेव्हा 9 ला उभा राहीलो तेव्हा 14000 हजार फरकाने निवडणूक दिलं. दुसऱ्या वेळी 21000 हजार फरकाने निवडणून दिलं. तिसऱ्या वेळा आम्ही 21450 हजार फरकाने जिंकलो. आणि आता एवढं अटीतटीचं असताना मला 26215 च्या फरकाने विजय मिळाला. आम्ही काम करतो. आमचे नेते 16 - 18 तास काम करत असतील तर आम्ही 14 - 15 तास काम केलं तर काय फरक पडणार?

Exclusive: शिवसेनेत जे घडलं त्याला रश्मी ठाकरेच कारणीभूत, मंत्री भरत गोगावलेंचा खळबळजनक दावा!

राष्ट्रवादीकडून पलटवार

झी 24 तासच्या टू द पाँईंट मुलाखतीमध्ये रोहयोमंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला. सिंचन घोटाळ्याची फाईल उघडणार असल्याचा इशारा गोगावलेंनी दिला. यावर राष्ट्रवादीनं पलटवार केलाय.. रायगडमधील थ्री इडियट्स म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी गोगावलेंचा समाचार घेतलाय. तसंच गोगावलेंचे आर्थिक घोटाळे उघड करु असा इशारा परांजपे यांनी दिलाय. गोगावले पालकमंत्रिपदासाठी हपापलेले आहेत असा हल्लाबोल परांजपेंनी केलाय.. 

गोगावलेंचे प्रत्युत्तर 

आमचा घोटाळा काढाल त्या क्षणी आम्ही राजीनामा देऊ. नाहीतर त्यांनी तोंड काळं करावं, असं प्रत्युत्तर भरत गोगावलेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिलंय. माझ्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत काय झालं असेल तर दाखवावं.  खिशातील पैसे टाकून आम्ही कामे केल्याचे ते म्हणाले. रायगड जिल्हा सोडून सगळ सुरळीत आहे. आम्ही जे बोललोय त्याचा ठाकरे गटांनी खुलासा करावा असेही गोगावले म्हणाले.