Mumbra ATS Raid : दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ भीषण स्फोट झाला. यात 9 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात ATS ची मोठी कारवाई केली आहे. मुंब्रा मध्ये एटीएसने कारवाई केली आहे. जमात-ए-इस्लामशी संबंध असल्याचा संशयावरुन शिक्षकाच्या घरावर धाड टाकण्यात आली आहे.
महाराष्ट्र एटीएसकडून आज ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात एटीएसने केलेल्या कारवाईत काही संशयितांना अटक करण्यात आली होती. या आरोपींच्या चौकशीत मुंब्रा येथे राहणाऱ्या एका शिक्षकाचा संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर आज सकाळी एटीएसने ही धाड टाकली.
मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसच्या पथकाने मुंब्रा येथील कौसा विभागात या शिक्षकाच्या निवासस्थानी तपास मोहीम राबवली. या वेळी अधिकाऱ्यांनी घराची तपासणी करून मोबाईल फोन, संगणक आणि काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. त्यानंतर संबंधित शिक्षकाला अधिक चौकशीसाठी मुंबईतील कुर्ला परिसरातील त्याच्या दुसऱ्या घरात नेण्यात आले असून, तिथे एटीएसची तपास मोहीम सुरू आहे.
सदर शिक्षकाचा संबंध जमात-ए-इस्लाम या संघटनेशी असल्याचा प्राथमिक तपासात संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अधिकृतरीत्या त्याचे नाव व संघटनेतील नेमका सहभाग याबाबत अद्याप एटीएसकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, या कारवाईनंतर मुंब्रा परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड चर्चेला उधाण आले आहे. एटीएसचे अधिकारी मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत असून, पुढील तपास गोपनीयपणे सुरू असल्याचे समजते.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More
LIVE|
SA
51/5(11.3 ov)
|
VS |
IND
|
| Full Scorecard → | ||
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.