महाराष्ट्राच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठा बूम! दिल्लीनंतर मुंबई जवळच्या 'या' एरियातील घरांच्या किंमती एका झटक्यात 15 टक्क्यांनी वाढणार?

दिल्लीनंतर मुंबई जवळच्या 'या' एरियातील घरांच्या किंमती एका झटक्यात 15 टक्क्यांनी वाढणार आहेत. महाराष्ट्राच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठा बूम येणार आहे.   

वनिता कांबळे | Updated: Oct 6, 2025, 09:12 PM IST
महाराष्ट्राच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठा बूम! दिल्लीनंतर मुंबई जवळच्या 'या' एरियातील घरांच्या किंमती एका झटक्यात 15 टक्क्यांनी वाढणार?

Navi Mumbai Real Estate: महाराष्ट्राच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठा बूम पहायला मिळाला आहे. दिल्ली-एनसीआर नंतर, नवी मुंबईमध्ये मालमत्ता खरेदी करणे सामान्य व्यक्तीसाठी आणखी महाग होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) सुरू होण्याच्या आणि कार्यान्वित होण्याच्या तयारीत असल्याने, आजूबाजूच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी वाढ झाली आहे. विश्लेषकांचा अंदाज आहे की किमती प्रति चौरस फूट 15,000 पर्यंत म्हणजचे तिपटीने वाढू शकतात.

Add Zee News as a Preferred Source

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) जवळच्या पनवेल, उलवे आणि खारघर सारख्या भागात रिअल इस्टेटच्या किमती वेगाने वाढत आहेत. ही वाढ सुधारित कनेक्टिव्हिटी, रोजगार निर्मिती आणि मोठ्या प्रमाणात व्यावसायिक विकासामुळे झाली आहे. गुंतवणूकदारांचा रस आणि मोठ्या विकास प्रकल्पांमुळे आधीच किमती वाढल्या आहेत.
नवी विमानतळाचे औपचारिक उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे.  विमानसेवा सुमारे दोन महिन्यांत, डिसेंबरमध्ये सुरू होईल, ज्यामुळे प्रदेशाच्या विकासाला आणखी चालना मिळेल.

आकडेवारीनुसार, जमीन आणि मालमत्तेच्या किमतींमध्ये लक्षणीय बदल होणार आहेत. नैनामधील जमिनीच्या किमती सध्या, नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) मधील जमिनीच्या किमती प्रति गुंठा 10117 चौरस मीटर म्हणजेच 5 लाख ते 25 लाख दरम्यान आहेत, म्हणजेच प्रति चौरस मीटर 5,00 ते 25000 होतात. नवी मुंबईतील, विशेषतः पनवेलमधील मालमत्तेच्या किमती 5 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या, पनवेल आणि नवीन पनवेलमधील किमती प्रकल्प आणि स्थानानुसार प्रति चौरस फूट 6,500 ते  10,500 दरम्यान आहेत. तथापि, विमानतळ सुरू झाल्यानंतर, या किमती प्रति चौरस फूट 12,500 ते 15,000 पर्यंत वाढू शकतात.

ही वाढ केवळ गुंतवणूकदारांसाठी एक मोठी संधी ठरणार आहे. तर दुसरीकडे या एरियात परवडणाऱ्या घरांच्या शोधात असलेल्यांसाठी चिंतेचे कारण आहे. ज्याप्रमाणे विमानतळ आणि एक्सप्रेसवेमुळे दिल्ली-एनसीआरमध्ये किमती नवीन उंचीवर पोहोचल्या आहेत, त्याचप्रमाणे एनएमआयए नवी मुंबईला रिअल इस्टेटच्या एका नवीन आणि अधिक महागड्या झोनमध्ये गेले आहे.

FAQ

1 नवी मुंबई रिअल इस्टेट मार्केटमध्ये सध्या काय बूम होत आहे?
महाराष्ट्राच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठा बूम सुरू आहे. दिल्ली-एनसीआर नंतर, नवी मुंबईमध्ये मालमत्ता खरेदी सामान्य व्यक्तीसाठी महाग होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) सुरू होण्याच्या तयारीमुळे आजूबाजूच्या भागात किमती वाढत आहेत. विश्लेषकांचा अंदाज आहे की किमती प्रति चौरस फूट १५,००० पर्यंत तिपटीने वाढू शकतात.

2 एनएमआयएमुळे कोणत्या भागात रिअल इस्टेट किमती वाढत आहेत?
उत्तर: एनएमआयएमुळे पनवेल, उलवे आणि खारघर सारख्या जवळच्या भागात रिअल इस्टेट किमती वेगाने वाढत आहेत. ही वाढ सुधारित कनेक्टिव्हिटी, रोजगार निर्मिती आणि व्यावसायिक विकासामुळे झाली आहे. गुंतवणूकदारांचा रस आणि मोठ्या प्रकल्पांमुळे आधीच किमती वाढल्या आहेत.

3. नवी मुंबई विमानतळ कधी सुरू होणार आहे?
उत्तर: नवी विमानतळाचे औपचारिक उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. विमानसेवा सुमारे दोन महिन्यांत, डिसेंबरमध्ये सुरू होईल, ज्यामुळे प्रदेशाच्या विकासाला चालना मिळेल.

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More