अरुण मेहेत्रे, झी 24 तास, पुणे :  चिमुकल्यासह कुटुंबावर काळाने घात केला. मृत्यूनं रस्त्यात गाठलं आणि घात झाला. भरधाव ट्रकने 4 ते 5 वाहनांनाना धडक दिली. या भीषण अपघातामुळे मोठं नुकसान झालं. हा अपघात पुण्याजवळ रविवारी झाल्याची माहिती मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघातात सहा महिन्यांच्या बाळासह तिघांचा मृत्यू झाला आहे. मुळशी रस्त्यावर लवळे गावात रविवारी दुपारी हा अपघात घडला. तानाजी ढमाले, रश्मी पटेल आणि रीहांश अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. 


रश्मी पटेल यांचे पती पवन जखमी आहेत. जखमींना जवळच्या रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या अपघातानंतर काहीवेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. 


 भरधाव ट्रक पुण्याकडून मुळशीकडे जात होता. घाट उतरत असताना चालकाचं ट्रकवरच नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.