अजित पवारांना मोठा दणका! नरेश अरोरांच्या कंपनीवर पुणे गुन्हे शाखेची कारवाई

महापालिका निवडणुकांच्या दोन दिवस आधी अजित पवार यांना मोठा दणका बसला आहे. अजित पवारांचे राजकीय सल्लागार यांच्यावर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. अजित पवारांसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 13, 2026, 06:32 PM IST
अजित पवारांना मोठा दणका! नरेश अरोरांच्या कंपनीवर पुणे गुन्हे शाखेची कारवाई

महापालिका निवडणुकांपूर्वी अजित पवारांना मोठा दणका बसला आहे. ज्यांच्या सल्लाने अजित पवारांच्या पक्षाची रणनीती आखली होती. अजित पवारांचा महापालिका निवडणुकांपूर्वी बदलेला रंग, बोलण्याची शैली यांच्याच सल्ल्याने बदलल्याचं म्हटलं जात होतं. लाडकी बहिण योजनेचा प्रचार अजित पवारांनी ज्या पद्धतीने केला तो याच नरेश अरोरा या राजकीय सल्लागाराच्या सांगण्यावरुन करण्यात आला होता. गुलाबी रंगाचं जॅकेट असो किंवा त्यांच्या पक्षाचे गुलाबी बॅनर असोत हे याच नरेश अरोरा यांच्या 'डिझाईन बॉक्स' या PR एजन्सीकडून डिझाईन करण्यात आले होते. 

Add Zee News as a Preferred Source

अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीवर पुणे गुन्हे शाखेची कारवाई केली आहे. पोलिसांकडे पैसे वाटपाची तक्रार आली होती म्हणून पोलीस चेक करून आले तिथे काहीही आढळून आलं नाही. 

पोलिसांना डिझाईन बॉक्स या कंपनीच्या विरोधात एक तक्रार प्राप्त झाली होती. ही तक्रार लेखी नसून फक्त तोंडी तक्रार होती. पोलिसांनी या तक्रारीची नोंद घेत संबंधित कंपनीच्या कार्यालयावर जाऊन या तक्रारीची खातरजमा केली. या ठिकाणी पोलिसांना काहीही प्रतिकूल आढळून आलं नाही त्यामुळे कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती पुणे पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. 

राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पैसे वाटपाची तक्रार आल्यावर चौकशीचा अधिकार खरंच क्राईम ब्रांचकडे जातो का?हे पहिलं पाहावं लागेल. अशापद्धतीचे मुस्कटदाबी करत असेल तर जनता उद्याच्या निवडणुकीत याचं उत्तर देईल. अशापद्धतीचं सत्तेचा किंवा जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला कुणी रोखत असेल तर ते योग्य आहे का? 

अशा कुठल्याही कारवाईने राष्ट्रवादीला कुणी रोखू शकत नाही. राष्ट्रवादी हा पक्ष जनतेच्या आशिर्वादावर चालणारा पक्ष आहे. कितीही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही पुढेच जाताना दिसू. 

काय आहे डिझाईन बॉक्स?

डिझाईन बॉक्स ही सोशल मीडिया एजन्सीवर अशा पद्धतीचा हल्ला करुन काय दबाव निर्माण करायचा होता. त्याबाबत काय कल्पना नाही अशी माहिती सुरज चव्हाण यांनी दिली आहे. मात्र पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात कुरघोडी सुरु असल्याच दिसत आहे. 

नरेश अरोरा (Naresh Arora) जे 'डिझाईन बॉक्स' (DesignBoxed) या प्रसिद्ध इलेक्शन कॅम्पेन मॅनेजमेंट कंपनीचे सह-संस्थापक आणि एमडी (MD) आहेत. निलेश अरोरा हे एक व्यवसाय सल्लागार आहेत, तर नरेश अरोरा राजकीय धोरण आणि प्रचारासाठी ओळखले जातात 

 नरेश अरोरा यांनी २०११ मध्ये 'डिझाईन बॉक्स'ची सुरुवात केली. ही कंपनी प्रामुख्याने राजकीय पक्षांसाठी डिजिटल मार्केटिंग आणि निवडणूक प्रचार व्यवस्थापनाचे काम करते. नरेश अरोरा हे राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी काँग्रेस पक्षासाठी अनेक राज्यांत (उदा. कर्नाटक, राजस्थान, पंजाब) महत्त्वाच्या मोहिमा राबवल्या आहेत.

ताज्या घडामोडींनुसार, महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार म्हणूनही नरेश अरोरा चर्चेत आहेत. २०२४ आणि २०२६ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कंपनीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांच्या सोशल मीडिया आणि प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
 १३ जानेवारी २०२६ रोजी पुण्यातील त्यांच्याशी संबंधित कार्यालयावर पुणे गुन्हे शाखेने (Crime Branch) कारवाई केल्याची बातमी समोर आली आहे. त्यांची कंपनी ग्राउंड लेव्हल डेटा गोळा करणे, मतदारांचे वर्तन तपासणे, सोशल मीडिया रणनीती ठरवणे आणि जाहिरातींचे व्यवस्थापन करणे यांसारखी कामे करते 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More