पुणे हादरलं! इंदापूरमध्ये आढळला पुरुषाच्या पायाचा तोडलेल्या अवस्थेतील भाग...

गुडघ्यापासून खालील पायाचा भाग आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने परीसरात गोंधळ उडाला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 12, 2025, 07:37 PM IST
पुणे हादरलं! इंदापूरमध्ये आढळला पुरुषाच्या पायाचा तोडलेल्या अवस्थेतील भाग...

पुणे हादरलं! इंदापूरमध्ये आढळला पुरुषाच्या पायाचा तोडलेल्या अवस्थेतील भाग आढळला आहे. गुडघ्यापासून खालील पायाचा भाग आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने परीसरात गोंधळ उडाला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील कळंब निमसाखर मार्गावर कळंब गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. एका हॉटेलपासून 500 ते 700 मीटर अंतरावर माणसाच्या डाव्या पायाचा अर्धा भाग आढळून आलाय.आज सकाळच्या सुमाराची घटना उघडकीस आली आणि यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

याची माहिती वालचंदनगर पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा पायाचा भाग पुरुष जातीचा असून तो डाव्या बाजूच्या पायाचा आहे

डाव्या बाजूच्या पायाचा गुडघ्यापासून खालील हा भाग असून तो वाहतुकीच्या रस्त्यावर पडलेला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकाराचा आता पोलीस सखोल तपास करत आहेत.

पोलिसांनी पाय तोडलेल्या आणि सॉक्स घातलेल्या पायावरून ओळख पटवण्यासाठी सर्वत्र शोधमोहीम सुरू केली आहे. जर कोणाला या वर्णनानुसार काही माहिती मिळाली, तर त्यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. बारामती विभागाची फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते. इंदापूरचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे आणि त्यांचे सहकारी सकाळपासूनच या प्रकरणाचा तपास करत आहेत. हा पाय नेमका कुणाचा आहे. तसेच ही घटना नेमकी कुठे घडली? काय आहे या घटनेमागचं गूढ काय? 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More