Maharashtra Election 2026 : ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. कट्टर मनसैनिक संतोष धुरी यांनी मनसेची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 24 तासांत राज ठाकरेंना दुसरा मोठा धक्का बसला आहे. मनसे प्रवक्त्यासह आणखी 8 नेत्याने पक्ष सोडला आहे. हे आठही जण मनसे पक्षात विविध पदांवर होते. या सर्वांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
मुंबईनंतर ठाण्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. मनसेला मोठा धक्का बसलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस राजाभाऊ चौगुले, मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे, मनसे चित्रपट सेनेचे सरचिटणीस राहुल तूपलोंढे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संदेश शेट्टी, मुनव्वर शेख, जनहित कक्षाचे ऍड. देवाशीष मर्क, प्रथमेश बांदेकर, संतोष यादव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे, शिवसेना सचिव सुशांत शेलार, शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे आणि शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. आधीच उमेदवारी न मिळाल्यामुळ नाराज अधिका-यांनी राज ठाकरेंची साथ सोडली, त्यात आता निष्ठावंत मनसैनिक अशी ओळख असलेल्या संतोष धुरींनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंना
जय महाराष्ट्र केला. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत संतोष धुरींनी भाजपात प्रवेश केला. प्रभाग क्रमांक 194 मधून उमेदवारी न मिळाल्यानं संतोष धुरी नाराज होते. अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करताच धुरींनी ठाकरे बंधूंवर टीकेचे बाण सोडलेत. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसमोर पक्ष सरेंडर केल्याचा आरोप धुरी यांनी केला आहे.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.