Nilesh Ghaiwal : पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळ हा बनावट पासपोर्ट तयार करुन लंडनला पळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निलेश घायवळनं अहिल्यानगर शहरातला पत्ता पासपोर्टवर टाकला होता. तो पत्ताही चार गल्ल्यांचा मिळून एक असा विचित्र पत्ता होता. पोलीस पडताळणीत बाद होऊनही गुंड निलेश घायवळला पासपोर्ट कसा मिळाला याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातंय. गँगस्टर निलेश घायवळविरोधात अखेर बनावट पासपोर्ट प्रकरणातही गुन्हा दाखल झालाय. खरी माहिती लपवण्यासाठी बोगस पत्ता आणि बनावट आधार कार्ड धारण करून पासपोर्ट काढल्याचा घायवळविरोधात आरोप आहे. कोथरूड गोळीबारानंतर घायवळ विरोधात सलग चौथा गुन्हा दाखल झालाय. हे प्रकरण ताजे असतानाच आता पुण्याच्या गुन्हेगारीत मोठा ट्विस्ट आला आहे. गुंड निलेश घायवळच्या भावावर गंभीर गुन्हे असताना गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी शस्त्र परवाना दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राज्यभरात गेले आठवडाभर सुरू असलेल्या कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळच्या बनावट पासपोर्ट प्रकरणानंतर घायवळ बंधूंकडून दुसरा प्रकार उघडकीस आलेयैने खळबळ उडाली आहे. निलेश बन्सीलाल घायवळ याचा सख्खा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याच्यावर खुनाचा प्रयत्न , आर्म्स ॲक्ट सारखे गंभीर गुन्हे दाखल असताना पुणे पोलिसांनी नाकारला असताना राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी 20 जून 2025 रोजी अधिकृत शस्त्रपरवाना दिल्याच उघडकीस आले आहे.
घायवळ टोळीचा निलेश घायवळ याच्यानंतर सचिन घायवळ म्होरक्या आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घायवळला शस्त्र परवाना दिल्याचे समोर आले आहे. गृहराज्यमंत्री यांच्या आदेशानंतर सुद्धा पुणे पोलिसांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना नाकारला होता. पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. पुणे पोलिसांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना नाकारल्यानंतर गृहराज्यमंत्री यांनी शासन आदेश दिला होता. सचिन घायवळ याच्यावर असलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हे दाखल असल्याने पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारला. 20 जानेवारी रोजी पुणे पोलिसांनी नाकारला अर्ज होता. 26 जून रोजी शासन आदेश झाल्यावर सुद्धा पुणे पोलिसांनी "होल्ड" केला आदेश.
सर्व आरोपानंतर योगेश कदम यांनी सचिन घायवळ प्रकरणात खुालासा केला आहे. योगेश कदमयांनी ट्विट करत दिल उत्तर दिले आहे. शिक्षक आणि व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. उपलब्ध कागदपत्रे आणि मा. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून, नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. म्हणूनच, सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीला संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहे. असा खुलासा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केला आहे.
निलेश घायवळशी जवळिक ठेवणाऱ्या समीर पाटीलकडे 100 कोटींची प्रॉपर्टी आली कुठून? याचीही चौकशी करावी, अशी मागणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. तसंच पुणे पोलिसांनी ज्या पद्धतीने आंदेकर टोळीवर च्या अवैध प्रॉपर्टीज बुलडोझर फिरवला तसाच बुलडोझर कोथरूड परिसरातील घायवळ, मारणे, मोहोळ टोळीवर कधी फिरणार? असा सवालही धंगेकर यांनी उपस्थित केला आहे.
FAQ
1 निलेश घायवळ कोण आहे आणि तो काय केले?
निलेश घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुंड आहे. त्याने बनावट पासपोर्ट तयार करून लंडनला पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. पासपोर्टवर अहिल्यानगर (पुणे) मधील विचित्र पत्ता (चार गल्ल्यांचा मिळून एक) टाकला होता. खरी माहिती लपवण्यासाठी बोगस पत्ता आणि बनावट आधार कार्ड वापरून पासपोर्ट काढल्याचा आरोप आहे. कोथरूड गोळीबारानंतर त्याविरुद्ध सलग चौथा गुन्हा दाखल झाला आहे.
2 निलेश घायवळला पासपोर्ट कसा मिळाला, जरी पोलिस पडताळणीत तो बाद झाला तरी?
पोलीस पडताळणीत निलेश घायवळ बाद झाला असूनही त्याला पासपोर्ट मिळाल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बनावट पासपोर्ट प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस तपास सुरू आहे. हे प्रकरण पुण्याच्या गुन्हेगारीत मोठा ट्विस्ट आणले आहे.
3. निलेश घायवळच्या भावावर काय गुन्हे आहेत आणि शस्त्र परवाना कसा मिळाला?
निलेशचा सख्खा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ हा घायवळ टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स ॲक्टसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांनी २० जानेवारी रोजी त्याचा शस्त्र परवाना अर्ज नाकारला होता. तरीही राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी २० जून २०२५ रोजी अधिकृत शस्त्र परवाना दिला. शासन आदेश २६ जून रोजी झाल्यानंतरही पुणे पोलिसांनी तो 'होल्ड' केला.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.