नवी मुंबई विमानतळाबाबत मोठी अपडेट! गौतम अदानी यांनी जाहीर केली उद्घाटनाची तारीख

नवी मुंबई विमानतळाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.  गौतम अदानी यांनी जाहीर केली उद्घाटनाची तारीख जाहीर केली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Mar 16, 2025, 08:47 PM IST
नवी मुंबई विमानतळाबाबत मोठी अपडेट! गौतम अदानी यांनी जाहीर केली उद्घाटनाची तारीख

Navi Mumbai Airport :  नवी मुंबई विमानतळाबाबात मोठी अपडेट समोर आली आहे.  नवी मुंबई विमानतळाचे काम हे जवळपास पूर्ण झाले. आता प्रतिक्षा आहे ती नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय  विमानतळाची जबाबदारी अदानी समूहाकडे आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट दिली आणि प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी गौतम अदानी यांनी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली. 

नवी मुंबई विमानतळ प्रकल्प हा अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) आणि महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) यांचा संयुक्त उपक्रम आहे. यामध्ये, AAHL ची 74 टक्के तर सिडकोची 26 टक्के भागिदारी आहे.
 फेब्रुवारी 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली. 16,700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले हे विमानतळ हे मुंबईच्या मुख्य विमानतळावरील गर्दी कमी करण्याची उभारण्यात येत आहे. हे विमानतळ भारतातील वाढत्या हवाई वाहतुकीच्या मागणीला पूर्ण करेल असा विश्वास गौतम अदानी यांनी व्यक्त केला आहे. 

नवी मुंबई विमानतळ हे भारताच्या विमान वाहतूक भविष्याची एक झलक आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम हे  जागतिक दर्जाचे आहे. हवाई कनेक्टिव्हिटीचे सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. हे विमानतळ भारतासाठी एक भेट आहे.  जून महिन्यात नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होईल अशी घोषणा गौतम अदानी यांनी केली. 

डिसेंबर 2023 मध्ये, अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे ​​सीईओ अरुण बन्सल यांनी एप्रिल महिन्यात नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होईल अशी घोषणा केली होती. 17 एप्रिल रोजी या विमानतळाचे व्यावसायिक उद्घाटन होणार होईल. मे महिन्याच्या दुसऱ्या सहामाहीत देशांतर्गत उड्डाणे पुन्हा सुरू होतील, तर जुलैच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार होतील असे ते म्हणाले होते. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 1 हजार 160 एकरवर पसरलंय. वाढत्या प्रवाशांच्या संख्येमुळे नवी मुंबई विमानतळाची उभारणी केली. विमानतळावर दोन रनवे तयार करण्यात आले आहेत.  ठाणे, कल्याण, रायगड, पुण्याच्या प्रवाशांना विमानतळाचा फायदा होणार आहे. 

या विमानतळाचा रनवे 3.7 किमी इतका लांब असून या विमातळावर एकाचवेळी 350 विमाने उभी राहू शकतात.  हे विमानतळ पूर्णपणे कार्यन्वित झाल्यानंतर वर्षाला 9 कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करु शकतात. या विमानतळाचा पहिला टप्पा एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर 2029 पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर, तिसरा टप्पा 2032 पर्यंत आणि चौथा टप्पा 2036 पर्यंत पूर्ण होईल.