Pune Koregaon Park Land Deal Parth Pawar: झी २४ तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले हा मुंढवा भागातील जमीन अमेडीया कंपनीला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होता. तशी माहिती समोर आली आहे. तहसीलदार येवलेने 40 एकर वतनाची जागा बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडून परत मिळवण्याबाबत प्रयत्न केला होता अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
40 एकर वतनाची जागा बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडून परत मिळवण्यासाठी येवलेने अनेक प्रयत्न केले. वतनदार भोगवटा भरण्यास तयार असल्याने त्यांना ती जागा परत देण्यात येत आहे असे पत्र जून महिन्यात बॉटिनीकल सर्वे ऑफ इंडिया या स़ंस्थेला दिले आणि ही जागा तात्काळ रिकामी करण्यास सांगितले होते. हे गोपनीय पञच झी 24 तासच्या हाती लागले आहे.
पत्रात येवलेने जुलै महिन्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयाला दुसरे पत्र लिहीले आणि ही जागा मूळ वतदनदारांना परत देण्याची प्रक्रिया सुरु करण्यास सांगितले. वतनदारांची पॉवर ऑफ एटर्नी शीतल तेजवानीकडे असल्याने आणि शितल तेजवानीने ही जागा 300 कोटींना अमेडीया कंपनीला विकली असल्याने ही जागा अमेडीया कंपनीला देण्याचे आदेश दिले. त्यामुळे तहसीलदार येवलेला हाताशी धरून ही जमीन बळकावण्याचे प्रयत्न अनेक महिन्यांपासुन सुरु होते हे दिसून येत आहे.
मुंढवा आणि बोपोडी जमीन प्रकरणात अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले पुणे शहरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे यापूर्वीचे निर्णय व आदेशांची तपासणी केली जाणार आहे.. यात काही संशयास्पद आढळल्यास त्यानुसारही कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. दरम्यान, येवले यांच्या सर्व आदेशांबाबत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे.
महाविद्यालयाच्या मालकीची सुमारे 13 एकर जमीन कुळांच्या नावे करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तत्कालीन तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्याची शिफारस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गेल्या महिन्यातच राज्य सरकारकडे केली होती. येवले यांनी याबाबत दिलेले आदेश प्रांताधिकारी सुनील जोशी यांनी रद्दबातल करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू केलेली आहे.
दरम्यान, बोपोडी जमीन हडप गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला गेलाय...त्यामुळे या प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचीही सखोल चौकशीही होणार आहे या निलंबित तहसीलदारांनी मुंढवा भूखंडाचा बेकायदा ताबा मिळवून देण्यासाठी बॉटनिकल सर्वे इंडिया संस्थेला ती जमीन हस्तांतरित करण्याचे लेखी आदेश दिले होते, याचीही चौकशी केली जाणार हे...यावरून शितल तेजवाणीने या शासकीय भूखंडावर याआधीही बेकायदा कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय.
FAQ
प्रश्न 1: पुणे कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणात काय घडले आहे?
उत्तर: निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी मुंढवा भागातील 40 एकर जमीन अमेडीया कंपनीला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते.
प्रश्न 2: येवले यांनी कोणत्या संस्थेकडून जमीन परत मिळवण्याचा प्रयत्न केला होता?
उत्तर: येवले यांनी बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडून जमीन परत मिळवण्याचा प्रयत्न केला होता.
प्रश्न 3: जमीन कोणाला विकली गेली होती?
उत्तर: जमीन शीतल तेजवानी यांनी 300 कोटींना अमेडीया कंपनीला विकली होती.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More
LIVE|
WI
(10 ov) 32/2 (75 ov) 205
|
VS |
NZ
278/9(74.4 ov)
|
| Full Scorecard → | ||
LIVE|
INA
182/5(20 ov)
|
VS |
PHI
64/5(10.2 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
SIN
(20 ov) 156/8
|
VS |
THA
152/9(20 ov)
|
| Singapore beat Thailand by 4 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 145/9
|
VS |
SIN
131/6(20 ov)
|
| Philippines beat Singapore by 14 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
INA
(20 ov) 75/9
|
VS |
MAS
78/3(9 ov)
|
| Malaysia beat Indonesia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.