पुण्याच्या जमीन गैरव्यहार प्रकरणात मोठी अपडेट; अहवालात पार्थ पवार यांच्याबाबत धक्कादायक खुलासा

झी-२४ तासच्या बातमीतील कागदपत्रानुसार शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील यांनी फसवणूक केल्याचे स्पष्ट आहे. परामाउंटच्या नावे कुलमुखत्यारपत्र असतानाही तेजवानी यांनी वैयक्तिक नावाने जमीन विकल्याचे चौकशीत समोर आले.  

वनिता कांबळे | Updated: Nov 18, 2025, 07:35 PM IST
पुण्याच्या जमीन गैरव्यहार प्रकरणात मोठी अपडेट; अहवालात पार्थ पवार यांच्याबाबत धक्कादायक खुलासा

Pune Koregaon Park Land Deal Parth Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी आपल्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून पुण्यातील कोरेगाव पार्क येथे 40 एकर जमिनीचा व्यवहार केला. 300 कोटींच्या व्यवहारासाठी अवघ्या 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर पुण्यात आणखी  एक मोठा जमीन गैरव्यवहार उघडकीस आला. या गैरव्यवहाराचे पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी डायरेक्ट कनेक्शन आहे. पुण्याच्या मुंढवा भागात हा नवा गैरव्यवहार झाला आहे.  पुण्याच्या मुंढवा भागातील वादग्रस्त जमिन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार  यांचे पुत्र पार्थ पवार   याचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. झी 24 तासने उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुठे समितीच्या चौकशी अहवाल समोर आला आहे.  अहवालात पार्थ पवार यांच्याबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अहवालात फक्त सबरजिस्टार रवींद्र तारू यांच्यावरच बेकायदेशीर दस्त नोंदणीचा ठपका ठेवण्यात आला आहे. अहवालात फक्त अमेडिया कंपनी आणि तिचे 1 टक्का शेअर होल्डर दिग्विजय पाटील यांच्याच नावाचा उल्लेख आहे. पार्थ पवार यांच्या नावाचा अहवालात कुठेही उल्लेख नाही.  समितीच्या आडून शासन पार्थ पवार यांना क्लीन चीट देऊ पाहतंय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

शासकीय जमिनी यापुढे परस्पर दस्त नोंदणी करून विकल्या जाऊ नयेत यासाठी जिल्हाघिकाऱ्यांनी सर्व शासकीय जमिनीची माहिती, त्यांचे सर्वे नंबर्स इत्यादी रेकॉर्ड मुंद्राक व नोंदणी शुल्क विभागाकडे देऊन ठेवावे अशी प्रमुख शिफारस अहवालात करण्यात आली आहे. दस्त नोंदणी पातळीवरील अनियमितता तपासण्यासाठी मुठे समिती गठीत करण्यात आली होती.
गैरव्यवहाराचा शोध घेण्यासाठी आणि तथ्य मांडण्यासाठी सह नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने चौकशी पूर्ण केली असून हा अहवाल नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रण कडे सादर केला आहे. 

मुठे समितीच्या अंतिम चौकशी अहवालात दोषारोप नेमके कोणावर ?

1. सब रजिस्टार रवींद्र तारू
आरोप...शासकीय जमिनीच उतारा बंद असतानाही दस्त नोंदणी करवून घेतली तीही अवघ्या 500 रूपयांच्या स्टँम्प ड्यूटीवर...!!!

2. शितल तेजवानी
आरोप...
272 वतनदारांची पॉवर ऑफ अँटर्नी दाखवून शासनाची जमीन परस्पर अमेडिया कंपनीला विकण्याचा प्रयत्न केला

3 अमेडिया कंपनी आणि दस्त नोंदणी करणारे कंपनीचे 1% भागधारक दिग्विजय पाटील, याउलट कंपनीचे 99% टक्के भागधारक पार्थ पवार यांच्या नावाचा अहवालात साधा नामोल्लेखही नाही

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More