महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी प्रकल्प; मुंबई-पुणे मिसिंग लिंक बाबत मोठी अपडेट
Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंक महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी प्रकल्प. या प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
Mumbai Pune Expressway Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंक हा महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी प्रकल्प आहे. मुंबई-पुणे मिसिंग लिंक बाबत मोठी अपडेट सोमर आली आहे. या मिसिंग लिंकमुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ आणि अंतर कमी होणार आहे. हा मिसिंग प्रत्यक्षात कधी सुरु याची प्रतिक्षा प्रवाशांना आहे. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रत्यक्षात कधी सुरु होणार याची माहिती समोर आली आहे.
हे देखील वाचा....महाराष्ट्रातील सर्वात मोठी कनेक्टिव्हीटी! मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग सुरतमार्गे थेट दिल्लीला जोडणार
एक्सप्रेस-वे-मार्गे मुंबई पुण्याला जोडण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प उभारला जात आहे. हा महाराष्ट्रातील लक्षवेधी प्रकल्प ठरला आहे. कारण, खंडाळा खोऱ्यात सुमारे 180 मीटर उंच केबल-स्टेड पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यामुळे अडचणी झाल्या होत्या. मात्र, आता हे काम देखील आता प्रगतीपथावर आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात चॅलेंजिंग प्रोजेक्ट मानला जात आहे. कारण, सह्याद्रीच्या डोंगरात अतिशय दुर्गम अशा भागात केबल स्टेड पुल उभारणे हे इंजीनीयर्ससाठी मोठे आव्हान होते.
हे देखील वाचा.... एका मुस्लिम राजाने बांधलेले महाराष्ट्रातील एकमेव दत्त मंदिर; दत्तसंप्रदायची राजधानी असलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
या मिसिंग लिंक प्रोजेक्ट अंतर्गत खोपोली एक्झिटपासून ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन्ही दिशेनं प्रत्येकी 4 मार्गिकांचे 2 बोगदे उभारण्यात आले आहेत. या बोगद्यांचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याची माहिती समोर येत आहे. यातील सर्वांत मोठ्या बोगद्याची लांबी 8.87 किलोमीटर आहे. तर दुसरा बोगदा 1.67 किमी लांबीचा असणार आहे. या दोन्ही बोगद्यांची 98 टक्के कामं पूर्ण झाले आहे.
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प आता पूर्णत्वाच्या टप्प्यात आला आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाअंतर्गत सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेल्या खंडाळा घाटात 180 मीटर उंच स्टेड पुल उभारला जात आहे. 14 किलोमीटर चा असणाऱ्या या मिसिंग लिंकच्या खंडाळा येथील केबल स्टेड पुलामुळे मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही. फक्त लोणावळ्यात प्रवेश करण्यासाठी या खंडाळा घाटातून जावे लागेल.
मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा मुंबई पुणे या दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या प्रकल्पाचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. मिसींग लिंकमुळे मुंबई पुणे या शहरातील अंतर 6 किमी ने कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा जवळपास 30 मिनीटांचा वेळ वाचणार आहे. डिसेंबर 2024 हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होता. मात्र, नियोजीत वेळेत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. यामुळे आता हा प्रकल्पाची अंतिम मुदत मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आली. जून 2025 मध्ये मुंबई-पुणे मिसिंग हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.