भाजपात मोठे बदल! 58 जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलले, वाचा संपूर्ण यादी, तुमच्या जिल्ह्यात कोण?

भाजपच्या 58 नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. संघटन बळकट करण्यासाठी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हा निर्णय घेण्यात आला आहे.   

शिवराज यादव | Updated: May 13, 2025, 04:21 PM IST
भाजपात मोठे बदल! 58 जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलले, वाचा संपूर्ण यादी, तुमच्या जिल्ह्यात कोण?

भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशानं राज्यातील विविध संघटनात्मक जिल्ह्यांसाठी नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि ही नियुक्ती प्रक्रिया पार पडली आहे. 

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या चार प्रमुख विभागांतील एकूण 58 जिल्ह्यांमध्ये नव्या अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. या नव्या नेतृत्वामार्फत पक्षाचे गावपातळीवरील संघटन अधिक बळकट करण्याचा आणि आगामी स्थानिक तसेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षकार्याला अधिक धार देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. 

वाचा संपूर्ण यादी

कोकण

1) सिंधुदुर्ग - प्रभाकर सावंत
2) रत्नागिरी उत्तर - सतिष मोरे
3) रत्नागिरी दक्षिण - राजेश सावंत
4) रायगड उत्तर - अविनाश कोळी
5) रायगड दक्षिण - धैर्यशील पाटील
6) ठाणे शहर - संदिप लेले
7) ठाणे ग्रामीण - जितेंद्र डाकी
8) भिवंडी - रविकांत सावंत
9) मिरा भाईंदर - दिलीप जैन
10) नवी मुंबई - राजेश पाटील
11) कल्याण - नंदू परब
12) उल्हासनगर - राजेश वधारिया

पश्चिम महाराष्ट्र

13) पुणे शहर - धिरज घाटे
14) पुणे उत्तर (मावळ) - प्रदिप कंद
15) पिंपरी चिंचवड शहर - शत्रुघ्न काटे
16) सोलापूर शहर - रोहिणी तडवळकर
17) सोलापूर पूर्व - शशिकांत चव्हाण
18) सोलापूर पश्चिम - चेतनसिंग केदार
19) सातारा - अतुल भोसले
20) कोल्हापूर पूर्व (हातकणंगले) - राजवर्धन निंबाळकर
21) कोल्हापूर पश्चिम (करवीर) - नाथाजी पाटील
22) सांगली शहर - प्रकाश ढंग
23) सांगली ग्रामीण - सम्राट महाडिक

उत्तर महाराष्ट्र 

24) नंदुरबार - निलेश माळी
25) धुळे शहर - गजेंद्र अंपाळकर
26) धुळे ग्रामीण - बापू खलाने
27) मालेगाव - निलेश कचवे
28) जळगांव शहर - दीपक सूर्यवंशी
29) जळगांव पूर्व - चंद्रकांत बाविस्कर
30) जळगांव पश्चिम - राधेश्याम चौधरी
31) अहिल्यानगर उत्तर - नितीन दिनकर
32) अहिल्यानगर दक्षिण - दिलीप भालसिंग

मराठवाडा

33) नांदेड महानगर - अमर राजूरकर
34) परभणी महानगर - शिवाजी भरोसे
35) हिंगोली - गजानन घुगे
36) जालना महानगर - भास्करराव मुकूंदराव दानवे
37) जालना ग्रामीण - नारायण कुचे
38) छत्रपती संभाजीनगर उत्तर - सुभाष शिरसाठ
39) छत्रपती संभाजीनगर पश्चिम - संजय खंबायते
40) धाराशि - दत्ता कुलकर्णी

विदर्भ

41) बुलढाणा - विजयराज शिंदे
42) खामगाव - सचिन देशमुख
43) अकोला महानगर - जयवंतराव मसणे
44) अकोला ग्रामीण - संतोष शिवरकर
45) वाशिम - पुरुषोत्तम चितलांगे
46) अमरावती शहर - नितीन धांडे
47) अमरावती ग्रामीण (मोरणी) - रविराज देशमुख
48) यवतमाळ - प्रफुल्ल चव्हाण
49) पुसद - डॉ आरती फुफाटे
50) मेळघाट - प्रभुदास भिलावेकर
51) नागपूर महानगर - दयाशंकर तिवारी
52) नागपूर ग्रामीण (रामटेक) - अनंतरावर राऊत
53) नागपूर ग्रामीण (काटोल) - मनोहर कुंभारे
54) भंडारा - आशु गोंडाने
55) गोंदिया - सिता रहांगडाले

मुंबई 

56) उत्तर मुंबई  - दिपक बाळा तावडे
57) उत्तर पूर्व मुंबई - दिपक दळवी
58) उत्तर मध्य मुंबई - विरेंद्र म्हात्रे