Raj Thackeray MNS Warning To BJP: बदलापूर येथील वादग्रस्त शैक्षणिक संस्थेचे सचिव तुषार आपटे यांना भारतीय जनता पार्टीने कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेत 'स्वीकृत नगरसेवक' म्हणून संधी दिली आहे. आपटे हे दोन वर्षांपूर्वी राज्याला हादरवणाऱ्या बदलापूरमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील वादग्रस्त शाळा चालवणाऱ्या संस्थेचे सचिव असल्याने या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त होत असतानाच आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या निर्णयाविरुद्ध दंड थोपटले आहेत. भाजपाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मोठी घोषणा केली आहे.
मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये, "मनसे बदलापूरात मोर्चा काढणार आहे. भाजपा विरोधात हा मोर्चा काढला जाणार आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटेचे नगरसेवक पद रद्द करा," अशी मागणी केली आहे. तुषार आपटे हा बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असल्याने भाजपाच्या या नियुक्तीचा मनसेने निषेध केला आहे. "तुषार आपटेचे नगरसेवक पद रद्द नाही केले तर मनसे अधिक आक्रमक होईल," असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.
"भारतीय जनता पक्ष स्वतःला पांढऱ्या पेशी पक्ष समजत आहे. अशा विकृत लोकांना नगरसेवक करत पक्षात घेतलं यावरून या पक्षाची मानसिकता कळते. इतर पालकांनी व अनेकदा कळवलं होतं की त्यांनी त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. तो अशा प्रकारची कृती करतोय. त्यावेळी या आपट्याने त्या सर्वांना पळवून लावले होते. अनेक जण अजूनही या घटनेमध्ये कोर्टात जात आहेत. अशा व्यक्तीला जर तुम्ही बदलापूरसारख्या शहरांमध्ये नगरसेवक पद देणार असेल तर आम्ही त्याचा निषेध करू भारतीय जनता पक्षाला विनंती आहे ताबडतोब त्याला नगरसेवक पदावरून हटवावे नाहीतर तुमची गाठ आमच्याशी आहे," असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.
"अशा फालतू लोकांना तुम्ही पुढे करणार असाल तर योग्य नाही. बदलापूर मध्ये काँग्रेसच्या विरोधात प्रचार केला आज त्याच काँग्रेसच्या नगरसेवकांना तुमच्यात घेतलं. एमआयएमला विरोध केला. पाया पडला सत्तेत बसण्यासाठी त्यांच्या," असा टोला अविनाश जाधव यांनी लगालवा आहे.
"जर आपटे बाबतीत निर्णय बदलला गेला नाही तर बदलापूरमध्ये महामोर्चाचे आयोजन मनसेच्या माध्यमातून केलं जाईल. आरएसएसची निगडित आहे म्हणून त्याला सर्व गुन्हे माफ करणार का? हे जर भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या नेत्याच्या मुलीसोबत झालं असतं तर सोडलं असता का तुम्ही लोकांनी? या प्रकरणात मनसेची भूमिका स्पष्ट करतो जर का नगरसेवकाला त्या पदावरून तात्काळ राजीनामा घेतला नाही तर येत्या 13-14 तारखेला मनसे बदलापूरमध्ये एक मोठा जनआंदोलन, एक मोठा मोर्चा या सर्वांच्या विरोधात उभा करेल," असं अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. हा मोर्चा नेमका किती मोठा असेल यामुळे बदलापूरमधील दैनंदिन जीवनावर काही परिणाम होणार का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र दोन वर्षापूर्वी हे प्रकरण झालं त्यावेळी ज्या पद्धतीने बदलापूरकर उस्फुर्त पद्धतीने रस्त्यावर उतरलेले तसेच रस्त्यावर उतरल्यास वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
ENG
(97.3 ov) 384 (88.2 ov) 342
|
VS |
AUS
567(133.5 ov) 161/5(31.2 ov)
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(45.2 ov) 152 (34.3 ov) 132
|
VS |
ENG
110(29.5 ov) 178/6(32.2 ov)
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 231/5
|
VS |
SA
201/8(20 ov)
|
| India beat South Africa by 30 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.