मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष आता मिटला आहे. गुरूवारी एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. फडणवीसांच्या शपथविधी आधी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. मात्र अखेर फडणवीस यांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीच. मात्र मुख्यमंत्री पद भूषवून सुद्धा कनिष्ठ पद (Junior) भूषवणारे देवेंद्र फडणवीस हे पाचवे मुख्यमंत्री ठरलेत. दरम्यान फडणवीस यांच्याआधी ज्यूनियर पद भूषवणारे हे चार नेते कोण होते, ते जाणून घेऊयात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शंकरराव चव्हाण
काँग्रेस नेते शंकरराव चव्हाण (Shankarrao Chavan) हे 1975 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आणि वसंतदादा पाटील यांच्या जागी दोन वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवले.1978 मध्ये पाटील मंत्रिमंडळातील मंत्री असलेले शरद पवार हे सरकार पाडून मुख्यमंत्री झाले. पवार यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारमध्ये शंकरराव चव्हाण अर्थमंत्री झाले.


शिवाजीराव पाटील निलंगेकर
शिवाजीराव पाटील निलंगेकर (Shivajirao Patil Nilangekar)यांनी जून 1985 ते मार्च 1986 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. काही वर्षांनंतर त्यांनी सुशीलकुमार शिंदे सरकारमध्ये महसूल मंत्री पद भूषवलं.  


नारायण राणे
नारायण राणे (Narayan rane)शिवसेनेत असताना 1999 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एका वर्षापेक्षा कमी काळ त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवलं. नंतर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.यावेळी विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते महसूलमंत्री झाले.


अशोक चव्हाण
काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok chavan)2008 ते 2010 दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 2019 साली शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉग्रेसचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. आणि 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले.