BJP Finalised List: नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, राज्यात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रत्येक पक्ष स्थानिक पातळीवर पडताळणी करत स्वतंत्र लढायचं की युती करायची यासंदर्भातील निर्णय घेत आहेत. अनेक पक्षांचा स्थानिक निवडणुका स्वबळावर लढण्यावर कल आहे. इतकंच नाही तर काही ठिकाणी अनपेक्षित युतीदेखील होत आहेत. कोल्हापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असून, नाशिकमध्ये मनसे महाविकास आघाडीसोबत लढणार आहे. इतकंच नाही तर काही ठिकाणी भाजपा-शिवसेना असे मित्रपक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यादरम्यान भाजपाने आपल्या नगराध्यक्षपदाच्या यादीवर शिक्कामोर्तब केलं आहे.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपा निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. बहुतांश उमेदवारांना पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहेत. काल संध्याकाळी उशिरा प्रदेश कार्यालयातून एबी फॉर्म रवाना झआले आहेत. उर्वरित जागांवरील उमेदवार निश्चिती दोन ते तीन दिवसात करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
अंबरनाथ नगरपालिकेची आगामी निवडणूक महायुतीतच लढावी, अशी आमची इच्छा आहे. पण तरीही जर कुणाला स्वबळावर लढायची इच्छा असेल, तर आमचीही तयारी असून ताकद आजमावायची असेल तर आमच्याकडेही पैलवान तयार आहे, अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपाला आव्हान दिलं आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांच्या सून तेजश्री करंजुले यांचे नाव पुढे आलं असून नुकत्याच झालेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात अंबरनाथ पालिकेत 'एक लाख टक्के भाजपाचाच नगराध्यक्ष बसेल', असा दावा भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केला होता. त्यांना श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.
"मी महायुतीचा कार्यकर्ता असून आगामी निवडणुका महायुतीतच व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे. परंतु कुणाला जर वेगळं लढायचं असेल, तर आमचीही तयारी असून ताकद आजमावायची असेल, तर आमच्याकडेही पैलवान तयार आहे," असं आव्हान खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार दिवसभर पुणे शहर कार्यालयात पक्ष बैठका घेणार आहेत. पुणे महानगरपालिका आरक्षण सोडतनंतर अजित पवारांच्या पक्ष कार्यालयात बैठका होणार आहेत. येणाऱ्या निवडणुका चांगल्या पद्धतीने जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. महापालिका निवडणूक लढवणासाठी इच्छुक असलेले उमेदवार अजित पवारांची भेट घेणार आहेत.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.