Gopichand Padalkar Vs Jayant Patil : भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जयंत पाटलांनी मंत्री असताना अनेकांच्या जमिनी हडपल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत केला आहे. या मुलाखतीत त्यांनी जयंत पाटलांनी हडप केलेल्या जमिनींच्या यादीचा पाढाच वाचला.
सांगली जिल्ह्यातले व्यापारी रमेश पोरवाल यांचा मृत्यू बेळगावच्या रुग्णालयात झाला तेव्हा जयंत पाटील हेलिकॉप्टरनं बेळगावला गेले. तिथं त्यांनी रमेश पोरवालचे अंगठे घेऊन जमीन आणि शॉपिंग कॉम्लेक्स त्यांच्याकडून हडपल्याचा आरोप गोपिचंद पडळकरांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर जमिनी हडपल्याचे खळबळजनक आरोप केले आहेत. टू द पॉईंटमधून गोपीचंद पडळकरांनी जमीन हडपल्याच्या यादीचा थेट पाढाच वाचून दाखवला. नगरपालिकेत 30 वर्ष सत्ता असताना जयंत पाटलांनी अनेक लोकांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप पडळकरांनी केला. कुलकर्णी एस.के नावाच्या एका व्यक्तीची 6 एकर जमीन जयंत पाटलांनी हडपली. तसंच स्वत:च्या इंग्रजी हायस्कूलसाठीही जयंत पाटलांनी 10 एकर जमीन बळकावल्याचा गंभीर आरोपही गोपीचंद पडळकरांनी केलाय.
सांगलीतील साखर कारखान्यावरूनही पडळकरांनी जयंत पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. सांगलीतील अनेक साखर कारखाने जंयत पाटलांनी हडपल्याचा आरोप पडळकरांनी केला. जतमधील साखर कारखाना जयंत पाटलांनी 44 कोटींना घेतला. त्या साखर कारखान्याची 280 एकर जमिनीपैकी 10 ते 20 एकर जमीन विकून बँकेत पैसे भरले असते तर कारखाना वाचला असता असंही यावेळी पडळकरांनी म्हटलंय.. तसंच सर्वोदय सहकारी साखर कारखान्यावरूनही पडळकरांनी जयंत पाटलांवर मोठा आरोप केलाय.
दरम्यान, जयंत पाटील-गोपीचंद पडळकर वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वैयक्तिक टीकेला आपला विरोध आहे. कुणीही वैयक्तिक टीका करु नये असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे. तर, समोरच्याला टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम करतो असा पलटवार जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केला आहे.
FAQ
1 गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर कोणते गंभीर आरोप केले आहेत?
गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर मंत्री असताना अनेक लोकांच्या जमिनी हडपल्याचा आरोप केला आहे. तसेच, सांगलीतील साखर कारखान्यांवरही हडपकरपणाचा आरोप त्यांनी केला आहे. हे आरोप 'टू द पॉईंट' या मुलाखतीत त्यांनी जमिनींच्या यादीचा पाढा वाचून सांगितले.
2 रमेश पोरवाल प्रकरणाबाबत काय आरोप आहेत?
सांगली जिल्ह्यातील व्यापारी रमेश पोरवाल यांचा मृत्यू बेळगावच्या रुग्णालयात झाला तेव्हा जयंत पाटील हेलिकॉप्टरने बेळगावला गेले. तिथे त्यांनी रमेश पोरवालचे अंगठे घेऊन त्यांची जमीन आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स हडपल्याचा आरोप गोपीचंद पडळकरांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशीसाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहेत.
3. नगरपालिकेतील जमीन हडपण्याबाबत कोणते उदाहरणे दिली गेली?
जयंत पाटलांनी नगरपालिकेत ३० वर्ष सत्ता असताना अनेक लोकांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप आहे. उदाहरणार्थ, कुलकर्णी एस.के. नावाच्या व्यक्तीची ६ एकर जमीन हडपली गेली. तसेच, स्वतःच्या इंग्रजी हायस्कूलसाठी १० एकर जमीन बळकावल्याचा गंभीर आरोपही केला गेला आहे.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More
LIVE|
UAE
239/9(50 ov)
|
VS |
NEP
138/3(33.3 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.