गुंड निलेश घायवळच्या 'त्या' व्हिडीओमुळे भाजपचा मोठा नेता अडचणीत?; कोण आहे तो?

निलेश घायवळ याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये भाजपचा मोठा नेता दिसून येत असून तो अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 9, 2025, 05:15 PM IST
 गुंड निलेश घायवळच्या 'त्या' व्हिडीओमुळे भाजपचा मोठा नेता अडचणीत?; कोण आहे तो?

पुणे गोळीबार प्रकरणात गुन्हा दाखल होताच गुंड निलेश घायवळ हा लंडनला पळून गेला होता. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले असून घायवळ प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. घायवळवर गंभीर गुन्हे असताना त्याला भारताबाहेर जाण्यासाठी पासपोर्ट कसे मिळाला, असा प्रश्न उपस्थित होत असताना. आता त्याचा सख्या भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवानासंदर्भातही मोठी अपडेट समोर आली आहे. गृहमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवानाला परवानगी दिली असा दावा करण्यात येत असताना. निलेश घायवळचा अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात भाजपचा मोठा नेता दिसून येत आहे. (BJP leader is in trouble because of that video Nilesh Ghaywal viral)

Add Zee News as a Preferred Source

गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या सहीनंतर सचिन घायवळला शस्त्र परवाना मिळाल्यामुळे राज्यातील वातावरण तापलं असताना. अजून एका भाजप नेत्यासोबतचा व्हिडीओमुळे महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा भूकंप आला आहे. 

कोण आहे भाजपचा हा नेता?

निलेश घायवळ याचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यात भाजप नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये निलेश घायवळ राम शिंदेंच्या पाया पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ राष्ट्रवादी कडून व्हायरल करण्यात आला आहे. 2024 विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी निलेश घायवळ हे कर्जत जामखेड  मतदारसंघांमध्ये राम शिंदे यांच्या प्रचार बैठका आणि गृहभेटी घेताना दिसत आहेत. यासोबतच राम शिंदे यांच्या विकास कामांमध्ये आणि जत्रेमध्ये एकत्रित फिरताना फोटो आणि व्हिडीओमधून पाहायला मिळते. 

हेसुद्धा वाचा - 'एका व्यक्तीच्या शिफारशीमुळे घायवळला शस्त्रपरवाना, त्या व्यक्तीचं नाव फडणवीसांना...', रामदास कदमांचा रोख नेमका कोणाकडे?

दरम्यान निलेश घायवळ राम शिंदेंच्या एका प्रचारामध्ये भाषण करताना दिसत असून राम शिंदेंना मतदान करण्याचं आवाहन तो करताना दिसतोय. शिंदे साहेब आपले आहेत, ते कोणत्याही कामामध्ये आपल्यामागे उभे राहतील असं म्हणताना निलेश घायवळ व्हिडीओमध्ये म्हणत आहे. 

FAQ

1: निलेश घायवळ प्रकरण काय आहे?
उत्तर: पुणे गोळीबार प्रकरणात गुन्हा दाखल होताच कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनला पळून गेला. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. घायवळवर गुन्हे असताना पासपोर्ट कसा मिळाला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

2: सचिन घायवळला शस्त्र परवान्याबाबत काय अपडेट?
उत्तर: निलेश घायवळचा सख्या भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना मिळाल्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीनंतर परवाना मिळाल्याचा दावा होत असून, यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे.

3: निलेश घायवळचा व्हायरल व्हिडिओ कोणाबाबत आहे?
उत्तर: निलेश घायवळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात भाजपचा मोठा नेता दिसतो. हा व्हिडिओ राष्ट्रवादी कडून व्हायरल करण्यात आला असून, महाराष्ट्र राजकारणात भूकंप आणला आहे.

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More