महाराष्ट्राच्या राजकारणात अभिनेत्रीचा वाद; प्राजक्ता माळीची माफी मागण्यास भाजप आमदाराचा जाहीर नकार; भूमिकेवर ठाम

Santosh Deshmukh : सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केली आहे. धस यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधही प्राजक्ता माळी यांनी नोंदवला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात कारवाई करण्याची विनंती करणार असल्याचंही प्राजक्ता यांनी म्हटलंय.

वनिता कांबळे | Updated: Dec 28, 2024, 08:45 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात अभिनेत्रीचा वाद; प्राजक्ता माळीची माफी मागण्यास भाजप आमदाराचा जाहीर नकार; भूमिकेवर ठाम

Prajakta Mali Vs Suresh Dhas : भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळींसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद पेटलाय. अभिनेत्री प्राजक्तानं धस यांच्याविरोधात महिला आयोगात धाव घेतली आहे. धस यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांनी माझी जाहीर माफी मागावी, अशी मागणी प्राजक्तानं केलीय. सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांनी समस्त महिलांचा अपमान केल्याचा आरोपही प्राजक्ता माळीनं केलाय.

Add Zee News as a Preferred Source

मात्र, आपण प्राजक्ता माळी यांची माफी मागणार नसल्याचं प्रत्युत्तर सुरेश धस यांनी दिलंय. आपण काहीच आक्षेपार्ह बोललो नसल्याचा दावा धस यांनी केलाय. इतकंच नाही तर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोपही धस यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही प्राजक्ता माळीनं सांगितलंय. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यांसदर्भात कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचंही प्राजक्ता माळीनं म्हटलंय.

बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी याप्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेत. याविषयी बोलतानाच सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्त माळीच्या नावाचा उल्लेख केला होता. 

धस यांच्या याच वक्तव्यावरून प्राजक्ता माळी यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. धस यांच्याविरोधात माळी यांनी महिला आयोगात धाव घेतली आहे. याप्रकरणात काय कारवाई होणार, हे पाहणं आता महत्त्वाचंय. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे तीन आरोपी फरार आहेत.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. आरोपींना अटक करता येत नसेल तर मंत्र्यांना अटक करून आता टाकण्याची मागणीही मनोज जरांगे यांनी केली आहे बीडमधील संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणावर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिलीय. आरोपी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई होणारच. असं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलं.

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More