एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला धक्का देत भाजपा-राष्ट्रवादीची युती, निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत बिघाडी!

BJP-NCP Alliance: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. 

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 13, 2025, 10:18 PM IST
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला धक्का देत भाजपा-राष्ट्रवादीची युती, निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत बिघाडी!
नगरपालिका निवडणूक

BJP-NCP Alliance: आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर बदलापुरात महायुतीत बिघाडी झालीय.बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का देत भाजप आणि राष्ट्रवादीने युती केलीय. त्यामुळे शिंदेंच्यी शिवसेना बदलापुरात एकाकी पडल्याचं चित्र आहे.त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत बदलापुरात भाजप-राष्ट्रवादी युती विरुद्ध शिवसेना यांच्यामध्ये मुख्य लढत होण्याची शक्यताय. 

Add Zee News as a Preferred Source

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. त्यातच बदलापुरात महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय. राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी बदलापुरात च भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने युती करत शिंदेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिलाय. या युतीमुळे शिंदे गट एकाकी पडल्याचं चित्र आहे. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन बदलापूरच्या विकासासाठी ही युती केल्याचं भाजप आमदार किसन कथोरे यांनी दिलीय.

एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीची घोषणी करण्यात आलीय. मात्र राज्यात एकत्र आहोत त्यामुळे बदलापुरातही शिवसेनेला सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आशिष दामले यांनी सावध भूमिका घेतलीय.

भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीमुळे एकाकी पडलेल्या शिवसेनेत संतापाची लाट पसरलीय... आम्हाला विश्वासात न घेता ही युती करण्यात आल्याचं शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी म्हटलंय. मात्र असं असलं तरी शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवून सत्ता मिळवू असा विश्वास वामन म्हात्रे यांनी व्यक्त केलाय.

तर राज्यभरात महायुती म्हणूनच लढण्याचा तिनही वरिष्ठ नेत्यांचा आग्रह आहे. असं भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. मात्र हे सांगतानाच त्यांनी काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढतीची शक्यता असल्याचे अप्रत्यक्ष संकेतही दरेकर यांनी दिलेत.

बदलापुरात भाजप आणि राष्ट्रवादीने युती जाहिर करत शिवसेनेला एकाकी पाडलंय.शिवसेनेनं स्वबळाचा नारा देत स्वबळावर नगराध्यक्ष बसवण्याचा निर्धार केलाय.निवडणुका अजून जाहिर झालेल्या नाहीत त्यातच बदलापुरात महायुतीत बिघाडी झालीय.. यामुळे बदलापुरातील निवडणुकीचं समीकरण बदलणार आहे.. बदलापूरात भाजप-राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच प्रमुख सामना रंगणाराय.

FAQ

बदलापूरात महायुतीमध्ये नेमकी काय बिघाडी झाली?

उत्तर: बदलापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस यांनी युती जाहीर केली, ज्यामुळे एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेला बाजूला सारले गेले. या युतीमुळे महायुतीतील एकजूटाला धक्का बसला असून, शिवसेना एकाकी पडली आहे. भाजप आमदार किसन कथोरे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना आणि बदलापूरच्या विकासासाठी ही युती केल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांनी युतीबाबत काय म्हटले?

उत्तर: राष्ट्रवादी नेते आशिष दामले यांनी सावध भूमिका घेतली असून, राज्यात महायुती एकत्र असल्याने बदलापूरातही शिवसेनेला सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले. तर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी राज्यभरात महायुतीनेच लढण्याचा आग्रह केला, पण काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढतीची शक्यता अप्रत्यक्षपणे सूचित केली.

शिवसेनेने युतीला कसा प्रतिसाद दिला?

उत्तर: भाजप-राष्ट्रवादी युतीमुळे शिवसेनेत संतापाची लाट उसळली असून, शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी विश्वासघात असल्याचे सांगितले. मात्र, शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवून नगराध्यक्षपद मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यामुळे बदलापूरात भाजप-राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा मुख्य सामना रंगण्याची शक्यता आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More