Ravindra Chavan Letter to Election Commission: निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे 24 नगराध्यक्ष आणि 204 नगरपालिका सदस्यांची निवडणूक लांबणीवर गेल्याने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक रद्द केल्याप्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पत्र लिहून आपली नाराजी बोलून दाखवली आहे. स्थगिती आणलेल्या जागांची निवडणूक रद्द करणे अयोग्य असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मतदानाला एक दिवस शिल्लक असताना निवडणुका स्थगित करणं अयोग्य असल्याचं भाजपचं मत आहे.
"महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे, मात्र नुकत्याच काढण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये राज्यातील जवळपास 24 नगराध्यक्ष आणि 204 नगरसेवक पदांची पुन्हा निवडणूक घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे याठिकाणी गोंधळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक 1966 मधील नियम 17(1) आणि राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी काढलेले सहपत्र आणि 29 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेले सुधारित निर्देश यामधील समन्वयाचा अभाव राज्य निवडणूक आयोगाने लक्षात घ्यावा असं आवाहन रविंद्र चव्हाण यांनी केलं आहे.
महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे, मात्र नुकत्याच काढण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये राज्यातील जवळपास २४ नगराध्यक्ष आणि २०४ नगरसेवक पदांची पुन्हा निवडणूक घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे… pic.twitter.com/oUNFSiKwkl
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) December 1, 2025
"ज्या ठिकाणी अपीलाचा निर्णय 26 नोव्हेंबर 2025 च्या नंतर लागला आहे, किंवा उमेदवार स्वतः शपथपत्र देत असेल, त्याठिकाणी सर्व बाबींचा विचार करून निवडणुका स्थगित न करता सुरु ठेवाव्यात, जेणेकरून राज्यातील सर्व मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल याबाबत राज्य निवडणूक आयोगाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा," अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती, अहिल्यानगरमधील कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी, लातूर जिल्ह्यातील रेणापूर, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, फलटण, सोलापूरमधील मंगळवेढा, यवतमाळ नगरपालिका, वाशिम नगरपालिका, चंद्रपूरमधील घुग्गुस, वर्धामधील देवळी, बुलढाणामधील देऊळगावराजा, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, सोलापूरमधील मंगळवेढा, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे.
जिल्हा व नगरपालिका/पंचायतींचा प्रभाग
पुणे (९ जागा) : दौंड- प्रभाग ९अ (१ जागा), लोणावळा - ५ब, १०अ (२ जागा), तळेगाव : २अ, ७अ, ७ब, ८अ, ८ब, १० (६ जागा) सातारा (३ जागा): कराड प्रभाग १५ब (१ जागा), मलकापूर - ४अ, ८अ (२ जागा)
सांगली (१ जागा) : शिराळा - प्रभाग ४
सोलापूर (३ जागा) : सांगोला : प्रभाग १ अ, ११अ (२ जागा), मोहोळ ३अ (१ जागा) यवतमाळ (६ जागा): दिग्रस प्रभाग २ब, ५ब, १०ब (३ जागा), पांढरकवडा ८ अ, ११ ब (२ जागा), वणी - १४ अ (१ जागा)
वाशिम (२ जागा): रिसोड - ५ब, १०अ
गडचिरोली (४ जागा): गडचिरोली- १ अ,
४ब, ११ ब (३ जागा), आरमोरी प्रभाग १० चंद्रपूर (४ जागा): गडचांदूर - प्रभाग ८ब (१ जागा), मूल- १०ब (१ जागा), बल्लारपूर - ९अ (१जागा), वरोरा ७ब (१ जागा)
गोंदिया (३ जागा): गोंदिया-३ब, ११ब, १६अ
भंडारा (२ जागा): भंडारा १५अ, १२अ नागपूर (९ जागा) : कोंढाळी- प्रभाग ८, १६ (२ जागा), कामठी १०अ, ११३, १७ब (३ जागा), रामटेक ६अ (१ जागा), नरखेड २ब, ५ब, ७अ (3 जागा)
वर्धा (७ जागा) : वर्धा - प्रभाग श्व, १९ब (२जागा), हिंगणघाट ५अ, ५३, ९अ (३ जागा), पुलगाव २अ, ५अ (२ जागा)
बुलढाणा (९ जागा) : खामगाव - प्रभाग ५अ, ७अ, २ब, १६ब (४ जागा), शेगाव -४अ, ४ब (२ जागा), जळगाव जामोद -प्रभाग ६अ, ६ब, ७ब (३ जागा)
जळगाव (१२ जागा) अमळनेर १अ (१
जागा), सावदा २ब, ४ब, १०८ (३ जागा), यावल ८ब (१ जागा), वरणगाव १०अ, १०क (२ जागा), पाचोरा ११अ व १२ब (२ जागा), भुसावळ ४ब, ५ब, ११ब (३ जागा) नाशिक (७ जागा) सिन्नर प्रभाग २अ, ४अ, ५अ, १०ब (४ जागा), ओझर १अ, ८ब (२ जागा), चांदवड प्रभाग ३ (१ जागा)
अहिल्यानगर (१२ जागा) जामखेड प्रभाग २ब, ४ब (२ जागा), श्रीगोंदा - ७ब (१ जागा), राहुरी २अ (१ जागा), संगमनेर -१ब, रब, १५ब (३ जागा), श्रीरामपूर ३अ (१ जागा), शेवगाव- १ब, ५अ, १२अ (३ जागा), शिर्डी : ६अ (१ जागा)
हिंगोली (२ जागा): हिंगोली ५ब, ११ब
परभणी (३ जागा) : जिंतूर - ११क (१ जागा), पूर्णा : १ब, १०ब (२ जागा) नांदेड (३ जागा): भोकर - प्रभाग पब (१ जागा), कुंडलवाडी - ३अ (१ जागा), लोहा ५८ (१ जागा)
बीड (१० जागा) : धारूर प्रभाग १०अ (१ जागा), अंबाजोगाई - पब, ३अ, ६अ, १०ब (४ जागा), परळी ९अ, १४ब, ३अ आणि ब, ११ब (५ जागा)
धाराशिव (३ जागा) : धाराशिव - प्रभाग २अ, ७ब, १४ब (३ जागा)
छत्रपती संभाजीनगर (८ जागा) : वैजापूर -प्रभाग १अ, २ब (२ जागा), गंगापूर ४ब, ६ब (२ जागा), पैठण ३अ, ६ब, ६अ, ११ब (४ जागा)
ठाणे (७ जागा) : बदलापूर प्रभाग ५, ८, १०, १५, १७, १९ (६ जागा), वाडा प्रभाग क्र.१२ (१ जागा)
पालघर (१ जागा): पालघर पूर्व - प्रभाग १ब
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.