मुंबई : राज्यातील दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल काल जाहीर करण्यात आलाय. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या ग्रामपंचायत निवडणूक निकालात सत्ताधारी भाजपने शानदार प्रदर्शन करत १३११ जागांवर विजय मिळवला. तर यात कॉंग्रेसला ३१२, शिवसेनेला २९५, राष्ट्रावादीला २९७ आणि इतरांना ४५३ जागा मिळाल्या.
Maharashtra Gram Panchayat Election Results: BJP wins 1311 seats, Congress-312, Shiv Sena-295, NCP-297 and others-453.
— ANI (@ANI) October 17, 2017
Great result in Phase 2 of the Gram Panchayat polls! Thank you Maharashtra. The continued faith in BJP inspires us to work even harder. https://t.co/qKnSbPbTdr
— Narendra Modi (@narendramodi) October 17, 2017
भाजपच्या या विजयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. त्यांनी ट्विट करून जनतेचे आभार मानले. ग्रामपंचायत निवडणुका दोन टप्प्यात ७ आणि १४ ऑक्टोबरला घेण्यात आल्या. पहिल्या टप्प्यासाठी ९ ऑक्टोबर मतदान झालं तर दुस-या टप्प्यासाठी १७ ऑक्टोबरला मतदान झाले होते.