'पार्थवर गुन्हा...' मुख्यमंत्र्यांचं नाव घेत कोरेगाव जमीन गैरव्यवहारावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Koregaon Park Land Controversy : आताच्या क्षणाची मोठी बातमी. पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरण आणि गुन्ह्याची नोंद यासंदर्भात शरद पवार यांचं सूचक वक्तव्य... पाहा काय म्हणाले...   

सायली पाटील | Updated: Nov 8, 2025, 01:14 PM IST
'पार्थवर गुन्हा...' मुख्यमंत्र्यांचं नाव घेत कोरेगाव जमीन गैरव्यवहारावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
breaking news sharad pawar on Parth pawar amid Koregoan Park Land Deal controversy latest update

Koregaon Park Land Controversy : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ करणाऱ्या आणि पवार कुटुंबाला हादरा देणाऱ्या कोरेगाव भूखंड गैरव्यवहार प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांकडून होणारे आरोप, नवनवीन खुलासे आणि समोर येणारी नावं या साऱ्यांदरम्यानच 'झी 24तास'नं ही मोठी बातमी दाखवल्यानंतर अवघ्या 48 तासांच्या आत कोरेगाव पार्कातील जमीन खरेदी व्यवहार रद्द करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं. या संपूर्ण प्रकरणात अद्यापही कैक प्रश्न उपस्थित होत असून, आता खुद्द (Sharad Pawar) शरद पवार यांनीसुद्धा त्यावर आपली पहिली प्रतिक्रिया माध्यमांसमोर मांडली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अकोला इथं माध्यमांशी संवाद साधत असलाना राज्याच्या राजकारणातील मातब्बर नेते अशी ओळख असणाऱ्या पवारांना त्यांचे नातू पार्थ पवार यांचं नाव गोवलं गेलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाती प्रश्न विचारला असता, 'पार्थवर गुन्हा का नाही, हे मुख्यमंत्रीच सांगतिल' असं सूचक विधान केलं. 

काय म्हणाले शरद पवार? 

जिथं सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांवरील होणाऱ्या आरोपांवर दिलेल्या प्रतिक्रियेनं अनेक प्रश्न उपस्थित झाले, त्याचसंदर्भात प्रश्न केला असता, आपल्या कुटुंबाची विचारधारा एक असून प्रशासकीय आणि कौटुंबीक गोष्टी वेगळ्या आहेत असं सांगताना 'सुप्रियाचं मत तिचं वैयक्तीक असू शकतं' असं पवारांनी स्पष्ट केलं. 

सदर प्रकरण आणि त्यात समोर आलेल्या गोष्टी या गंभीर असून, त्यासाठी सरकारनं समिती स्थापन केली आहे. त्यामुळं पार्थ प्रकरणात चौकशी करून मत समाजासमोर ठेवलं पाहिजे. जमीन गैरव्यवहार प्रकरणात सत्य समाजासमोर आलं पाहिजे आणि . पार्थवर गुन्हा का नाही मुख्यमंत्रीच सांगतील..., असं शरद पवार म्हणाले. 

हेसुद्धा वाचा : कोरेगाव पार्क जमीन व्यवहार रद्द झाल्याची पावती आली समोर, LIVE कार्यक्रमात यातीलही बनवाबनवी झाली उघड!

 

इथं शरद पवारांनी या प्ररकरणावरील प्रतिक्रिया देण्यापूर्वी शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2025 रोजी अजित पवार यांनी माध्यमांना कोरेगाव प्रकरणी माहिती देत हा व्यवहार रद्द झाल्याची माहिती दिली. याचदरम्यान कोरेगाव जमीन प्रकरणावर पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न विचारला असता, 'कोणी कोणाची फसवणूक केली, याची चौकशी होईल. कोणी सांगितल्यामुळं हे घडलं, कोणाचे फोन गेले, कोणाकडून या प्रकरणात दबाव आणला होता? आणला होता तर कोणी आणला होता? याबाबतची चौकशी होईल,' असं म्हणत हा व्यवहार झाल्याचं आपल्याला ठाऊक नव्हतं, ठाऊक असतं तर आपत त्याबाबतच सांगितलं असतं असं ते माध्यमांना उद्देशून सांगत 'जे काही असेल ते नियमानुसार करा' याचाच त्यांनी पुनरुच्चार केला. 

 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More