आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : वेस्ट इंडिजचा प्रसिद्ध शैलीदार डावखुरा माजी फलंदाज ब्रायन लारा सध्या ताडोबाच्या सफरीवर आलाय. ताडोबाच्या कोलारा या प्रवेशद्वारातून त्यानं प्रवेश केला. तिथल्याच एका रिसॉर्टमध्ये थांबल्याची माहिती आहे. लारा कालच इथं आला आणि सकाळीच त्याने सफारी केली. विश्वचषक स्पर्धा सुरू असताना हा ग्रेट खेळाडू इथं कसा, असा प्रश्न सर्वाना पडलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा माजी क्रिकेटर अनिल कुंबळेने काही दिवसांपूर्वी ब्रायन लाराला वाघाचे फोटो दाखवले होते, ते फोटो पाहून लारा म्हणाला होता, मला देखील ताडोबाला जायचंय, अखेर ब्रायन लाराने ताडोबाला भेट दिली.


क्रिकेट जगतात वाघ म्हणून ओळखला जाणारा, वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाला आहे. यावरून ताडोबाचे आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन अधिक पर्यटकाना आकर्षित करतं हे दिसून आलं आहे.


ब्रायन लारा वाघाचे दर्शन करण्यासाठी आणखी काही दिवस घालविणार असल्याचं सांगितलं जात आहे. एका खासगी रिसॉर्टमध्ये त्याचा मुक्काम आहे. उद्या मोहुर्ली येथून सकाळी तो जंगल सफारीचा आनंद लुटणार आहे. हा दौरा कौटुंबिक असल्याचे बोलले जात आहे.