Ashok Kharat: कथित ज्योतिष कॅप्टन अशोक खरात याच्या लैंगिक शोषण प्रकरणाची व्याप्ती आता आणखी वाढताना दिसतेय. त्यामुळं सध्या असलेल्या एक तक्रारदारापेक्षा अनेक तक्रारदार समोर येण्याची शक्यता आहे. पोलीस दलातील अतिशय विश्वासू सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास व्हिडिओंची संख्या खूप मोठी असल्याचं सांगण्यात येतंय.. त्यामुळं या प्रकरणात आणखी काही तक्रारदार पोलिसांकडं धाव घेण्याची शक्यता आहे. कॅप्टन अशोक थोरातच्या लैंगिक शोषणाच्या कथा अंगावर शहारे आणणा-या आहेत. लोकांना मानसिक आधार देण्याच्या बहाण्यानं हा सैतान काय काय करायचा? याची सगळी कहाणी विकृतीचा कॅप्टन या विशेष भागात जाणून घेऊया.
झी 24 तासंनं एक व्हिडीओ समोर आणलाय. ज्यात महिलेची ओळख जबाबदारी आणि जाणिवपूर्वक लपवण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये बाबा महिलेच्या हाताला कथित रसायन लावताना दिसत आहे. या रसायनाचा वास तो महिलेला घ्यायला सांगायचा. यानंतर महिलांना गुंगी यायची. मग तो आपला डाव साधायचा, अशी धक्कादायक बाब समोर येत आहे.
दुसऱ्या एका पीडितेने आपल्यावर घडलेला प्रसंग सांगितला आहे. मला एक पेढा खायला दिला. यानंतर पाणी प्यायला दिलं. त्या पाण्याची चव खूपच विचित्र होती. त्या पेढ्यात कोणतं औषध होतं का? याची चौकशी पोलिस करणार आहेत. तो पेढा खाल्यानंतर महिलेला मळमळल्यासारखं वाटलं. ते औषध तू जितकं जास्त घेशील तेवढं लवकर बरं होईल, असे तो महिलेला सांगायचा. महिलेने दूर लोटण्याचा प्रयत्न केला. मी कृष्णाचा अवतार असून तू या जन्मीची राधा आहेस,असे बाबाने सांगितले. माझे डोके जड झाले. तो बाबा मला वश करत असल्याचे मला जाणवले. त्या महिलेला बाबाने धमकीदेखील दिली. तू प्रेयसी म्हणून राहिली नाहीस तर तुझं लग्न मोडेल, नवरा मरुन जाईल, असे तो बाबा सांगत असे, अशी आपबीती पीडितेने दिली.
अशोक खरातकडील रसायनांची चौकशी होणार आहे. अशोक खरात कथित कस्तुरीचा महिलांवर प्रयोग करायचा, कस्तुरी लावल्यानंतर अशोक खरात महिलांचं शोषण करत असल्याची माहिती आहे. दरम्यान खरातकडे असणारी ती कस्तुरीच की इतर काही रसायन याचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
RCB
(20 ov) 240/4
|
VS |
MI
222/5(20 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Mumbai Indians by 18 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
LSG
(20 ov) 164/8
|
VS |
GT
165/3(18.4 ov)
|
| Gujarat Titans beat Lucknow Super Giants by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NAM
(49 ov) 198
|
VS |
SCO
199/3(38 ov)
|
| Scotland beat Namibia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.