Onion Export Duty Maharshtra Farmer : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. 1 एप्रिलपासून कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याने बळीराजा चिंतेत होता. अकेरीस शेतकऱ्यांना संकटातून बाहरे काढणारा निर्णय सरकारने घेतला आहे.
जगभरात सर्वात जास्त कांदा महाराष्ट्रातून निर्यात होतो. मात्र केंद्र सरकारचं निर्यात धोरण कांदा उत्पादक शेतक-यांना मारक ठरतंय. वारंवार आंदोलनं झाली मात्र तरीही केंद्र सरकारनं याकडे दुर्लक्ष केले. आज पुन्हा लासलगावमध्ये आंदोलन झालं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात याचे पडसाद उमटले होते. कांदा उत्पादक शेतक-यांना कधी कांदा रडवतो तर कधी सरकार. लाल कांद्याची आवक वाढलीय तर उन्हाळी कांदाही बाजारात येऊ लागला. त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झालीय.
कांदा निर्यात करायचा तर त्यावर 20 टक्के निर्यातशुल्क लावण्यात आलंय. या दुहेरी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलनं करत कांद्यावरचं निर्यातमूल्य काढण्याची मागणी शेतकरी करत आहेत. शतेकऱ्यांनी अनेकदा आंदोलन देखील केला. अखेर शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आले आहे.