माथेरान : गेल्या दीड वर्षापासून यार्डात असलेली माथेरानची राणी रविवारी अखेर रुळावर आलीये. माथेरानची राणी अर्थात मिनीट्रेनची रविवारी चाचणी घेण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच बाग्या आणि दोन इंजिनांसह माथेरानची राणी आज रुळावर धावली. येत्या १ नोव्हेंबरपासून माथेरानची मिनीट्रेन पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे.


माथेरान बाजारपेठ ते अमनलॉज या दरम्यान ही गाडी चालवली जाणार आहे. माथेरानची मिनी ट्रेन सुरु करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती.



अनेक आंदोलनांनंतर रविवारी अखेर रेल्वे प्रशासनानं या गाडीची चाचणी घेतलीये.