टिटवाळा स्थानकात पंजाब मेलखाली येऊन एका व्यक्तीचा मृत्यू; बंद फाटकात काय घडलं?

Central Railway Accident : टिटवाळा स्थानकात दुर्दैवी अपघात; पंजाब मेलखाली व्यक्तीचा मृत्यू. घटनेनंतर प्रवाशांत भीतीचे वातावरण; रेल्वे वाहतूक तासभर प्रभावित. नेमका कसा घडला हा अपघात? जाणून घ्या...   

सायली पाटील | Updated: Mar 27, 2026, 07:03 AM IST
टिटवाळा स्थानकात पंजाब मेलखाली येऊन एका व्यक्तीचा मृत्यू; बंद फाटकात काय घडलं?
central railway news accident reported at titwala station Punjab Express latest update

उमेश जाधव, झी मीडिया, टिटवाळा : (Central Railway Accident ) मध्य रेल्वेच्या कल्याण–कसारा मार्गावरील टिटवाळा रेल्वे स्थानकात गुरुवारी (दि. 26 मार्च) रात्री सुमारे 9 ते 9.30 वाजण्याच्या सुमारास धावत्या (Punjab Express Accident) पंजाब मेलखाली येऊन एका अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून फिरोजपूरकडे जाणाऱ्या या मेलगाडीखाली ही घटना घडली. सदर घटनेनंतर स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. ज्यामुळं रेल्वे वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली. 

Add Zee News as a Preferred Source

जुन्या बंद रेल्वे फाटकाजवळ झाला अपघात...

अपघातासंदर्भातील प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्ती जुन्या बंद रेल्वे फाटका जवळ अचानकच रुळांवर आल्याने हा अपघात घडला. प्रथमदर्शनी हाच अंदाज व्यक्त केला जात आहे. गाडी वेगात असल्याने चालकाला अचानक तिचा वेग कमी करणं किंवा ती थांबवण शक्य झालं नाही आणि व्यक्ती गाडीखाली सापडून तिथंच मृत्यू ओढावला. 

अपघाताची तीव्रता लक्षात घेता मृत्यू जागीच झाल्याची माहिती आहे. घटना घडल्यानंतर स्थानकावरील प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. काहींनी तात्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांना या अपघाताची माहिती दिली. रेल्वे प्रशासनाने तातडीने प्रतिसाद देत घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया पार पाडली. या दरम्यान काही काळ तणावपूर्ण आणि गोंधळाचं वातावरण निर्माण रेल्वे स्थानकात पाहायला मिळालं.

हेसुद्धा वाचा : 'अशोक खरात प्रकरण खूपच भयानक, पण...' अमृता फडणवीस यांची महिलांचा लैंगिक अत्याचार करणाऱ्या खरातवर प्रतिक्रिया

 

अतिशय भीषण स्वरुपातील या अपघातामुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. परिणामी त्या दरम्यानच्या काही गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावल्या. सुमारे एक तास रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून मिळाली. दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे अशी माहिती समोर येतेय. अपघात नेमका कशामुळे घडला, याचा शोध घेतला जात आहे. रेल्वे रुळ ओलांडताना नियमांचे पालन न केल्यामुळे अशा घटना घडत असल्याचे वारंवार समोर येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाने पुन्हा केलं आहे.

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More