Mumbai Goa Highway: गोव्याला जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग हा एकमेव पर्याय आहे. मात्र लवकरच गोव्यासाठी आणखी एक मार्ग आकार घेत आहे. केंद्र सरकारने या मार्गासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळं आता मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक-कोंडी कमी होणार आहे. तसंच, नागरिकांचा प्रवासदेखील सुलभ होणार आहे. कसा असेल हा मार्ग आणि या मार्गाची रुपरेखा कशी असेल? जाणून घेऊया.
जेएनपीटीला जोडणाऱ्या 6 पदरी रस्त्याला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. या मार्गाची लांबी 28 किलोमीटर असणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून 4 हजार 500 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आलीय. यामुळे मुंबई पुणे महामार्ग आणि मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. सध्या जेएनपीटीवर पोहोचण्यासाठी ट्राफिकमुळे 2 ते 3 तास लागतात. जेएनपीटीला जोडला जाणाऱ्या या मार्गाची सुरुवात पागोटे या गावापासून होणार आहे.
या महामार्ग अनेक महत्त्वपूर्व महामार्गांना जोडणार आहे. त्यापैकी उरण-चिरनेर हायवे, गोवा हायवे आणि पुणे एक्स्प्रेसवे यांना जोडण्यात येणार आहे. भविष्यात हा महामार्ग अलिबाग-विरार मल्टीमॉडल कॉरिडोर, मुरबाड-जुन्नर हायवे, समृद्धी एक्स्प्रेसवे आणि नाशिक हायवेला जोडण्यात येईल. वडोदरा-मुंबई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेवेला देखील जोडण्यात येईल. या महामार्गामुळं JNPT, गोवा, पुणे आणि मुंबईतील प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
हा नवीन महामार्ग अटल सेतूच्या शिवडीच्या टोकापासून ते कोस्टल रोड आणि वरळीच्या सीलिंकला जोडण्यात येईल. भविष्यात अलिबाग-विरार मल्टीमोडल कॉरिडॉर, मुरबाड-जुन्नर महामार्ग, समृद्धी एक्सप्रेसवे आणि पडघा जवळील नाशिक महामार्गाशी (मोरबे, कर्जत, शेलू, वाघानी आणि बदलापूर मार्गे) जोडले जाईल. नवीन महामार्गावर 10 हजारांहून अधिक वाहने. ज्यात मल्टी एक्सल कंटेनर ट्रकदेखील धावू शकणार आहेत.