भाजपच्या बड्या नेत्याने तोच प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला ज्याचे उत्तर त्यांनी संपूर्ण भाषण संपले दिले नाही; काय आहे हा प्रश्न?

  राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज विजयी मेळाव्यात एकत्र आलेत. राज्य सरकारनं हिंदी भाषेचा जीआर मागे घेतल्यानंतर दोन्ही बंधूंनी विजयी मेळाव्याची घोषणा केली होती. तब्बल 19 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्यावर एका मंचावर आले. यावेळी ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंच्या टीका जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  

वनिता कांबळे | Updated: Jul 5, 2025, 06:22 PM IST
भाजपच्या बड्या नेत्याने तोच प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला ज्याचे उत्तर त्यांनी संपूर्ण भाषण संपले दिले नाही; काय आहे हा प्रश्न?

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray Raj Thackeray:  राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज विजयी मेळाव्यात एकत्र आलेत. राज्य सरकारनं हिंदी भाषेचा जीआर मागे घेतल्यानंतर दोन्ही बंधूंनी विजयी मेळाव्याची घोषणा केली होती. तब्बल 19 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्यावर एका मंचावर आले. यावेळी ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंच्या टीका जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  

विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकेची झोड उठवली. बटेंगे तो कटेंगे असा नारा देत भाजपने केवळ धर्माच नव्हे तर जातीपातीचंही राजकारण केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय.. मतांसाठी मराठी माणसांमध्ये भांडणं लावल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलाय. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ठाकरेंच्या मेळाव्यावर टीका केली आहे.  मराठीच्या गोंडस नावाखाली आज उद्धव ठाकरे यांनी वरळीत सत्ता गेल्याचं शोकगीत गायलं. पण मुख्यमंत्री असताना 2022 मध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला, याचं उत्तर त्यांनी दिलंच नाही. ‘मराठी भाषा’ ही केवळ भावनांमध्ये उभी राहणारी अस्मिता नाहीतर ती धोरणात दिसली पाहिजे. पण तुम्ही मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं. आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा मराठीवर बेगडी प्रेम करत आहात.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातून स्पष्ट होतंय की, त्यांचा खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर ‘म’ म्हणजे ‘महापालिका’ आहे! यांचं मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की आठवण येणारी राजकीय नौटंकी आहे. जनतेनं आता हा दुटप्पीपणा ओळखला आहे अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.  ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी टीका केली. विजयी मेळाव्यात राजकारणाचा दर्प दिसत होता. दोन्ही नेत्यांनी भविष्यातील राजकीय पेरणी केल्याचं ही दरेकरांनी म्हटलंय. तर ठाकरे बंधूंनी हा राजकीय मेळावा होता हे सिद्ध करुन दाखवल्याची टीका केली.