)
पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला अखेर मुंबईच्या धर्मादाय आयुक्तांनी तात्पुरती स्थगिती देत जैसेथेची ऑर्डर दिली आहे. या निकालाबाबत जैन बांधवांचे याचिकाकर्ते समाधानी आहेत पण खासदार मोहोळांना या वादात ओढणाऱ्या धंगेकरांना माञ अजूनही हे सर्व षडयंत्रच वाटत आहे. जैन बोर्डिंगचा नेमका काय वाद हे ते समजून घ्या.
पुण्यातली मॉडेल कॉलनीतली हिच ती जैन बोर्डिंग. जैन बोर्डिंगच्या 3 एकर जमिनीच्या संशयास्पद जमीन खरेदी व्यवहारावरून थेट केंद्रीय मंञी मुरलीधर मोहोळ अडचणीत आले होते. मोहोळ यांचे पूर्वीश्रमीचे व्यावसायिक भागिदार विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंगच्या ट्रस्टी लोकांशी हाताशी धरून मोक्याची 3 एकर जागा अवघ्या 230 कोटींना घशात घातल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी गेल्याच आठवड्यात मोर्चा काढून केला होता.
या जैन बोर्डींगच्या जागेचा व्यवहार करताना या परिसरातलं महावीर मंदिरच खरेदीखतांतून गायब केल्याचा गंभीर आरोप झाल्याने पुण्यातील जैन बांधवांनी मोर्चा काढून संताप व्यक्त केला. या वादात मग कसब्याचे माजी आमदार रवी धंगेकरांनीही उडी घेत खासदार मोहोळांवर थेट जमीन चोरीचे गंभीर आरोप केला. त्यावर मोहोळांनी जाहिर खुलासा करत सरळ हात झटकले.
याच दरम्यान,आज मुंबई धर्मादाय आयुक्तांकडे या संशयास्पद जमीन व्यवहाराची सुनावणी झाली आणि या व्यवहाराला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. रवींद्र धंगेकर माञ, अजूनही खासदार मोहोळांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत .तसंच आजचा धर्मादाय आयुक्ताचा आदेश म्हणजे निव्वळ फार्स असल्याचा आरोप केला आहे.
पण इथं मुळात मुद्दा हा आहे की, ज्या चकोर दोशी नावाच्या प्रमुख ट्रस्टींनी ही 2500 कोटींची जमीन अवघ्या 230 कोटीत बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला ते या सगळ्या वादात कुठेच समोर येऊन स्पष्टीकरण देताना दिसत नाहीत याचाच अर्थ दाल में कुछ काला है. म्हणूनच जैन समाजाने हे प्रकरण शेवटपर्यंत धसास नेण्याची गरज आहे.