close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'बीव्हीजी' ग्रुपचे मालक हणमंतराव गायकवाड यांना १६ कोटींना गंडा

हणमंतराव गायकवाड यांनी आकर्षक परताव्याच्या अमिषाने गुंतवणूक केली होती... मात्र त्यात त्यांची फसवणूक झाली

Updated: Jul 19, 2019, 05:48 PM IST
'बीव्हीजी' ग्रुपचे मालक हणमंतराव गायकवाड यांना १६ कोटींना गंडा

पिंपरी चिंचवड : बीव्हीजी (भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेड) कंपनीचे मालक हणमंतराव गायकवाड यांची तब्बल साडे सोळा कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. सावा मेडिको लिमिटेड कंपनी, बायोडिल लँबोरेटिज लिमिटेड, अनघा फार्मा या कंपनीत त्यांनी आकर्षक परताव्याच्या अमिषाने गुंतवणूक केली होती. मात्र त्यात त्यांची फसवणूक झाली. याप्रकरणी विनोद जाधव आणि त्यांची पत्नी सुवर्णा जाधव यांच्याविरोधात गायकवाड यांनी चिंचवड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याबाबतचा अधिक तपास सुरु आहे. 

पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर फळ विकणारा मुलगा ते कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या उद्योगाची उभारणी असा हणमंतराव गायकवाड यांचा नावलौकीक आहे. त्यांची 'बीव्हीजी' ही कंपनी देशातील अनेक संस्था आणि कंपन्यांना व्यवस्थापन, हाऊसकिपिंग आणि गार्डनिंग अशा सेवा पुरविते.