Chhagan Bhujbal: काल दोन्ही नेत्यांनी राजकीय स्थितीवर परखड भाष्य केले. माणसाच्या मताला काही किंमत ठेवली नाही. पैशाचा बाजार सुरूय. शिसारी येणे, गुलामांचा बाजार हे दोघांचेही एकच मत आहे. भाजपचे मांडलिक शिंदेही बादशहा समजून गुलामांची बोली लावतायत. हे दिल्लीतल्या दोन बादशहांकडून सुरू असल्याचे संजय राऊत म्हणाले.
शरद पवार व अजित पवार जवळपास एकत्र आलेत वाटतायत. दोघांचेही उमेदवार एका चिन्हावर लढतायत. शरद पवार हे अजित पवारांसह मविआत येतील. शरद पवार आमच्यासोबत आहेत. अजित पवार यांच्यावर तिथं कारवाई होईल. त्यांना सरकारमधून बाहेर पडावे लागेल, दोन्ही दगडांवर पाय नाही ठेवता येणार नाही, असेही राऊत म्हणाले. सोलापुरात दोन्ही शिवसेना एकत्र लढतायत हे अधिकृत नाही. उद्धव ठाकरे असा निर्णय घेणार नाहीत. काही घडलंय याची माहिती नसल्याचे राऊतांनी स्पष्ट केले.
तसेच यावेळी त्यांनी राज ठाकरेंवरही भाष्य केले. पक्ष म्हणून एकत्र आलोय. सगळं विसरायला हवं हे वाक्य महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे व्यंगचित्रकार आहेत. ते सहजसोपे बोलले. डॅा यादव यांचे ते उदाहरण आहे. राज ठाकरे यांच्या केवळ भाषणाचा काय एकत्र आल्याचा फायदा असल्याचे ते म्हणाले.
भाजपकडे सत्ता आहे तोवर ते सर्व तन मन धनाने त्यांच्याकडे असतील. मेलेले मेंढर आगीला भीत नाही. तुम्ही क्लिनचिट दिलीय ना. उगीच डरकाळ्या का फोडताय. भुजबळ निर्दोष असल्याचा निकाल दिलाय. ईडीने आता प्रायश्चित्त घ्यायला हवे, असे राऊत म्हणाले.
प्रितीसंगमामुळे भितीसंगम निर्माण झाली. त्यांची गटस्थापना घटस्थापनेपर्यंत जाईल. शिंदे रूसून बसलेत. सून रुसून बसलीय सारखं दिल्लीत सासरेकडे जावे लागतंय. भाजप माझे ते माझे व तुझे ते माझ्या बापाचे. केडीएमसीतल्या त्या नगरसेवकांचे आम्ही पोस्टर लावू. यांना आपण पाहिले का? भाजप शिंदेंच्या कार्यालयातही पोस्टर लावू असे राऊत म्हणाले.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
ITA
|
VS |
CAN
|
| Italy beat Canada by 10 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
IND-A
|
VS |
USA
|
| India A beat USA by 38 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SCO
|
VS |
AFG
|
| Afghanistan beat Scotland by 61 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.