)
एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना निदा खानला आश्रय देणं भोवलंय. मतीन पटेल यांच्या अनधिकृत घरावर छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं बुलडोझर चालवलाय. महापालिकेनं पटेल यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. मात्र कोर्टानंही दिलासा न दिल्यानं महापालिकेनं अनधिकृत घरं जमिनदोस्त केलीत..
नाशिक लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील संशयित निदा खानला आश्रय देणं नगरसेवक मतीन पटेलांना चांगलंच महागात पडलं आहे, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं मतीन पटेलांच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर चालवला आहे. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेलांनी निदा खानला आश्रय दिला होता, त्यामुळे या प्रकरणात त्यांनाही सहआरोपी करण्यात आलं आहे. मतीन पटेलांना पालिकेनं 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता, त्यानंतर पटेल यांनी कोर्टात धाव घेतली, मात्र कोर्टाकडूनही दिलासा न मिळाल्यानं पटेलांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. मतीन पटेलचं अनधिकृत घरं, कार्यालय आणि निदाला आश्रय दिलेल्या घरावरही बुलडोझर चाललं आहे..
कोर्टाकडून कोणतीही स्थगिती मिळाली नसल्यानं कारवाई केल्याचं पालिका अधिका-यांनी सांगितंल आहे, 24 तासांचा अल्टिमेटम पूर्ण झाल्यानंतरच ही कारवाई केल्याचंही त्यांनी म्हटलंय. तर 24 तास पूर्ण झालेले नसतांना कारवाईची घाई का? असा सवाल इम्तियाज जलीलांनी केला आहे.
महानगरपालिकेनं घरावर केलेल्या कारवाईनंतर इम्तियाज जलील यांनी काही सवालही उपस्थित केले आहेत. मतीन पटेलांच्या घरातील सदस्यांचा यात काय दोष होता? त्यामुळे त्यांनी कुठे राहायचं असा सवाल जलील यांनी केलाय. तर अनधिकृत घरं होती म्हणून ती पाडली असं स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिलं आहे.
मतीन पटेलांच्या घरावर केलेल्या कारवाईनंतर त्यांना पुन्हा घर उभारून देऊ असं इम्तियाज जलीलांनी म्हटलंय.. मतीन पटेल यांचं घर पाडलं ते बांधून देण्याची ताकद आमच्यात आहे असं जलीलांनी सांगितलं. तर जलील असं म्हणत असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी संजय शिरसाटांनी म्हटलं आहे.
नाशिक आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणात निदा खानला पोलिसांनी अटक केली आहे, दरम्यान या प्रकरणात इम्तियाज जलील यांनी निदा खानची पाठराखण केलीय, त्यामुळे संजय शिरसाट यांनी जलिलांचा समाचार घेतला आहे, तर निदा खानचा मास्टरमाईंड जलील असल्याचा आरोप राणेंनी केलाय, त्यामुळे ते जेलमध्ये जाणार असा दावा देखील राणेंनी केला आहे.
नाशिक आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणात निदा खान संशयित आहे, त्यामुळे तिला अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे, मात्र अनेक दिवस तिनं पोलिसांना गुंगारा दिला होता, एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेलांनी तिला आश्रय दिला होता, निदाला दिलेला आश्रय मतीन पटेलांना भोवला असून त्यांच्या अनधिकृत घरांवर अखेर पालिकेनं बुलडोझर चालवला आहे.