छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अप्रकाशित चित्र पहिल्यांदाच समोर, तुम्ही पाहिलंय का?
Chhatrapati Shivaji Maharaj : जगभरातील तमाम शिवप्रेमींसाठी अभिमानाची बातमी.
पुणे : Chhatrapati Shivaji Maharaj : जगभरातील तमाम शिवप्रेमींसाठी अभिमानाची बातमी. छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अप्रकाशित चित्र पहिल्यांदाच समोर आले आहे. (Shivaji Maharaj Original Pic) पुण्यातील इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांना फ्रान्समधील सॅव्ही कलेक्शनमध्ये हा मौल्यवान खजिना सापडला आहे.
या चित्रात छत्रपती शिवरायांचा करारी तसेच प्रसन्न अशी मुद्रा, डोक्यावर शिरोभूषण आणि तुरा, खांद्यावर शेला दिसत आहे. हे चित्र शिवकालीन असून सतराव्या शतकातील गोवळकोंडा चित्रशैलीत चित्रित आहे. ( Chhatrapati Shivaji Maharaj Unpublished picture in Savvy Collection at France)
या आधी छत्रपती शिवाजी महाराज यांची तीन ऐतिहासिक चित्रांचा शोध लागला होता. परदेशातील संग्रहालयांमध्ये महाराजांची ही चित्रे जतन करण्यात आली आहेत. दरम्यान, आता नव्याने अप्रकाशित चित्र समोर आले आहे.
1700 शतकामधील ऐतिहासिक चित्रं
महाराष्ट्राची छाती अभिमानाने फुलून यावी, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास. हिंदवी स्वराज्याचा इतिहास घडवणाऱ्या शिवाजी महाराजांच्या तीन ऐतिहासिक, पुरातन, दुर्मीळ चित्रांचा आता शोध लागल्यानंतर आता अप्रकाशित चित्र समोर आले आहे. जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिकेतल्या म्युझियममध्ये ही चित्रे असल्याची माहिती इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांनी समोर आणली आहे.
गोवळकोंडा शैलीतली ही चित्रे सतराव्या शतकातील आहेत. दोन चित्रांवर पर्शियन आणि रोमन लिपीत महाराजांचं नाव लिहिले आहे. या चित्रांमध्ये महाराजांच्या पेहरावात डौलदार शिरोभूषण, त्यावर खोवलेला तुरा, पायघोळ अंगरखा, सुरवार, पायात मोजडी आहे. कानात मोत्याचा चौकडा, बोटात अंगठी आणि गळ्यात दोन मोत्यांच्या माळा असे अलंकार दिसत आहेत. करारी मुद्रा, बोलके डोळे आणि चेहऱ्यावरची स्मितहास्ययुक्त प्रसन्नता ही महाराजांच्या तत्कालीन वर्णनात आढळणारी वैशिष्ट्ये चित्रातून दिसून येत आहेत.