Chicken, Fish Price Hike News In Marathi : चिकन, अंडी, मासे खाणाऱ्या खवय्यांचा खिशावरचा भार काहीसा अधिक वाढणार आहे. एकीकडे कमालीची महागाई वाढत आहे. त्यातच आता मासे आणि चिकनचे दरही वाढले आहेत. महाराष्ट्रसह देशात मासे आणि चिकनच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान पावसाळ्यामुळे खोल समुद्रातील मासेमारी बंद झाल्याने किनारपट्टीवर मच्छीमारांचा नावा परतू लागल्या आहेत. परिणामी मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने मासळीच्या दरात वाढ झाल्याचे समजत आहे. (Chicken, Fish Price Hike)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मासे आणि चिकन हे दोन्ही उत्कृष्ट मांसाहारी पदार्थ आहेत. दोन्हीमध्ये प्रथिने पुरेशा प्रमाणात आढळतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी लोक मासे आणि चिकन खातात. मांसाहारी करणारे मासे स्टार्टर म्हणून खातात त्यानंतर चिकन किंवा मटण खातात. मात्र आता खवय्यांची हिरमोड होणार आहे. कारण पावसाळ्यापूर्वी मच्छिमारांच्या नावा किनाऱ्यावर परतू लागल्या आहेत. त्यामुळे माशांची आवक कमालीची घटली आहे. परिणाणी बाजारात माशांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी दर वाढले आहेत. यामुळे माशांसह चिकनच्या दरातही वाढ झाली आहे.


चिकनच्या दरात प्रतिकिलो मागे 10 रुपयांनी वाढ झाली आहे. तर अंड्याचे दर 35 रुपयांनी वाढले आहेत. मागणीअभावी अंड्याच्या दरात 30 रुपयांनी घट झाली आहे. फलंदाजीचा दर स्थिर आहे. तर मांस मार्केटमध्ये समुद्रातील मासे 5 ते 6 टन, खाडीतील मासे 200 ते 400 किलो, नदीतील मासे 1 ते 12 टन आणि आंध्र प्रदेशातील राहू, कतला, सिलांची मिळून एकूण 15 ते 20 टनांची आवक झाल्याची माहिती देण्यात आली. तर चिकनचे दर 260 रुपये किलोवर पोहोचले आहेत. अशा स्थितीमुळे तुटवडा आणि मागणी जास्त असल्याने मासेमारीची आवक वाढली आहे. सध्या मच्छिमारी बंद असल्याने माशांचे दर कडाडले आहेत. 


मांसाहारामध्ये सर्वसाधारणपणे मासे आणि मटणाच्या तुलनेत चिकन आणि अंडी स्वस्त (Cheap chicken and eggs) असतात. यांच्या दरामध्ये मोठा फरक असतो. म्हणूनच बहुतेक मांसाहारी लोक त्यांच्या आवडीचा विचार करून अंडी किंवा चिकनला प्राधान्य देतात. मात्र आता राज्यात तसेच देशात चिकनच्या दरात वाढ झाली आहे. सध्या चिकनचा दर 260 रुपये किलो आहे. कोंबड्यांची आवक घटल्याने आणि मागणी वाढल्याने कोंबडीचे दर वाढले आहेत. गेल्या सहा महिन्यांतच दरात मोठी वाढ झाली आहे. गावरान कोंबडीला जास्त मागणी असल्याने गावरान कोंबडीचे चिकनला जास्त मागणी आहे. अतिउष्णतेमुळे कोंबडे मरून गेल्याने पोल्ट्री उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. आवक कमी आणि कोंबडीची जास्त मागणी यामुळे कोंबडीचा भाव किलोमागे 260 रुपयांवर गेला आहे. येत्या काळात दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.