नाशिक : Malegaon district News : आताजी सर्वात मोठी बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मालेगाव दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मोठी घोषणा करण्याची शक्याता आहे. मुख्यमंत्र्यांकडून मालेगाव जिल्हा निर्मितीचे गिफ्ट मिळण्याची शक्यताआहे. अनेक वर्षांची मागणी होती. आज मुख्यमंत्री स्वत: याबाबत घोषणा करतील, अशी माहिती माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार दादा भुसे यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित असलेली मालेगाव जिल्हा निर्मितीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानिमित्त करण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होणाऱ्या विभागीय आढावा बैठकीत यावर सकारात्मक निर्णय होणार असल्याचे सूतोवाच माजी कृषिमंत्री आणि मालेगाव बाह्य मतदार संघाचे आमदार दादा भुसे केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आमदार सुहास कांदे हेही यावेळी उपस्थित होते. 


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. तसेच पोलीस परेड मैदानावर जाहीर सभा आणि नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भुसे यांनी दिली. मालेगाव जिल्ह्याची घोषणा केली तर नाशिक जिल्ह्याचे विभाजन होईल. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात आणखी एका जिल्ह्यात भर पडणार आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव हा तालुका म्हणून ओळखला जात आहे.