CIDCO Lottery Navi Mumbai Infra News : देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं. या मुंबईच्या इतिहासात डोकावलं असता आतापर्यंत झालेला विकास हा भारावणारा आहे. जागतिक दर्जाचं शहर ठरणाऱ्या या मुंबईमध्ये वर्षागणिक नवनवीन पायाभूत सुविधा आल्या. ज्या वेगानं मुंबईत या सुविधा वाढल्या, त्याच वेगानं शहरात या सुविधांचा उपभोग घेणारी लोकसंख्यासुद्धा वाढली. मूळ रहिवाशांसह इतर राज्यांतून, ठिकाणहून आलेल्यांनाही मुंबईनं आधार दिला. याच मुंबईला टक्कर देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबईसुद्धा सज्ज होत असल्याचं चित्र आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ, अटल सेतू, मिसिंग लिंक आणि मुंबई पुणे एक्स्प्रेस वेशी असणारी जोडणी यासह सिडकोनं वसवलेलं नियोजित शहर म्हणजेच ही नवी मुंबई. उत्तम गृहसंकुलांसाठी प्रामुख्यानं मागील दशकभराच्या काळात अनेकांचीच पावलं नवी मुंबईच्या दिशेनं वळली. मोठे रस्ते, मुलांना खेळण्यासाठीची उद्यानं आणि नोकरीच्या संधी देणारी वाणिज्य केंद्रसुद्धा नवी मुंबईत उभी राहिली. याच विकासाला आता आणखी वेग मिळणार आहे तो म्हणजे एका मोठ्या आणि दृरदृष्टीतून आखलेल्या आराखड्यानं.
नव्या वर्षात स्वत:चं घर आणि तेसुद्धा नवी मुंबईतील घर घेण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्यांसाठी चालू आर्थिक वर्षात सिडको 19300 घरं बांधणार आहे. 'सर्वांसाठी हक्काची घरे' या शीर्षकाखाली सिडकोनं नव्या वर्षातही गृहनिर्मिती सुरुच ठेवली असून, सध्या सिडकोच्या घरांपैकी 2025-26 या आर्थिक वर्षात महामंडळाने 16876 सदनिकांची गृहनिर्माण योजना जाहीर केली होती.
नागरिकांनी या योजनेला दिलेल्या प्रतिसादानंतर 2026-27 मध्येसुद्धा 19300 घरांची योजना राबवण्यात येणार आहे. एकात्मिक पायाभूत सुविधा विकास, शाश्वत शहरी नियोजन आणि नागरिक-केंद्रित विकास हीच धोरणं सिडकोनं केंद्रस्थानी ठेवली असून, देशातील सर्वात प्रगत शहरांच्या यादीत नवी मुंबईला सरशी मिळवून देण्याचा ध्यास सिडकोनं घेतला आहे.
फक्त घरं नव्हे, तर बीकेसीच्या धर्तीवर खारघरमध्ये जागतिक वाणिज्य केंद्र अर्थात बिझनेस कॉम्प्लेक्सची पायाभरणीसुद्धा केली जाणार आहे. ज्यामुळं आता ही नवी मुंबई खऱ्या अर्थानं हायटेक होणार असं म्हणणं गैर नाही. येत्या काळात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 6777 कोटींची तरतूद करण्यात आली असून, आता प्रत्यक्षात हा बदल कसा दिसतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नुकताच सिडकोनं 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसकल्प मांडला. ज्यामध्ये 16250 कोटींचं उत्पन्न आणि 16150 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची बाब निदर्शनास आणण्यात आली. जिथं 100 कोटींच्या शिल्लत रकमेनं लक्ष वेधलं.
नवी मुंबईत बंगले किंवा रो-हाऊसच्या भूखंडांवर बांधलेल्या बहुमजली इमारतींचे नियमितीकरण आणि पुनर्विकासाबाबत सिडकोनं नवी धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली. ज्याअंतर्गत हजारो घरमालकांना त्यांच्या मालमत्तेचं कायदेशीर हस्तांतरण, गहाणखत आणि पुनर्विकास करणं सोपं होईल. नियोजन प्राधिकरणाची परवानगी घेऊन बांधलेल्या इमारतींचं बांधकाम आता अतिरिक्त शुल्क न आकारता नियमित मानलं जाणार आहे. ज्यामुळं त्यांना कायमस्वरुपी ओळख असेल. परिणआमी त्यांची विक्री करण्याचा किंवा बँकेत गहाण ठेवण्याचा घरमालकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
RR
(11 ov) 150/3
|
VS |
MI
123/9(11 ov)
|
| Rajasthan Royals beat Mumbai Indians by 27 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 250/3
|
VS |
CSK
207(19.4 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Chennai Super Kings by 43 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.