Dhananjay Munde To Resign MLA Suresh Dhas Reacts: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातील धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरामध्ये एकच खळबळ उडाली असून सर्वच स्तरातून हे फोटो आणि व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला जात आहे. असं असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश दिले असून आज म्हणजेच 4 मार्च रोजीच राजीनामा द्यावा असं स्पष्टपणे पक्षप्रमुख अजित पवारांसमोरच सांगितलं आहे. या प्रकरणावरुन प्रतिक्रिया समोर येत असतानाच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करणारे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी थेट पंकजा मुंडेचं नाव घेत निशाणा साधला आहे.
धनंजय मुंडेंना मुख्यमंत्री फडणवीसांनी राजीनामा घ्यायला सांगितल्यासंदर्भात बोलताना सुरेश धसांनी, "राजीनाम्याबाबत मलाही माहिती समजली. बीभत्स प्रकार घडला होता. काही नेत्यांनी असे प्रकार घडत असतात असं असंवेदनशीलपणे म्हटलं होतं," असं मत मांडलं. "मी भाषणात मांडलेले मुद्दे तंतोतंत खरे ठरले. अजितदादांनी आता निर्णय बदलू नये. हत्येचे व्हिडीओ सर्वांनी पाहिले. राजीनाम्याच्या निर्णय घेण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. प्रत्येक मागणीला त्यांनी होकार देत कारवाई केली. मुख्यमंत्री राजीनामा घेऊन त्यांना घरी पाठवतील," असा विश्वास सुरेश धस यांनी व्यक्त केला.
"मी माहिती घेतल्याशिवाय बोलत नाही. दोन पाय आडवे लावून काय करतायत. या सर्वांना तात्काळ फाशी द्या. फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवा. मुख्यमंत्री बोलले त्याप्रमाणे काम केलं. खंडणीमुळे हा प्रकार घडला," असं सुरेस धस म्हणाले. "फोटो पाहिल्यावर मी पण रडलो," असंही धस यांनी नमूद केलं. "राजीनामा होईल की नाही याबाबत धाकधूक होती. देवाभाऊंनी न्याय दिला," असं धस म्हणाले.
"मी एसआयटीचे मनापासून आभार मानतो. चार्जशीटमध्ये सांगितलं आहे की आम्ही पुरवणी चार्जशीट देणार आहोत. देशमुख कुटुंबीय आणि त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहीजेत. उर्वरित आरोपींवर कारवाई व्हावी," अशी मागणी धस यांनी केली.
मुंडेंचं राजीनामा घेतला तर मंत्रालयाला घेराव घालू असे काही जण म्हणाले. "वाल्मिकशिवाय पानही हालत नाही असं पंकजा म्हणाल्या मग खुनाचे पान कसे हलले?" असा सवाल धस यांनी विचारला आहे. पंकजा मुंडेंनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी धनंजय मुंडेंच्या एका प्रचारसभेत वाल्मिक कराडसंदर्भात बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत धस यांनी हे विधान केलं. "मला मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. या लोकांची गुर्मी उतरली," असंही धस यांनी प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं आहे.
पंकजा मुंडे या बीडसंदर्भात भाष्य करत नसल्याच्या मुद्द्यावरुन धस यांनी खोचक प्रतिक्रिया नोंदवली. "मीडियाला विनंती की ताईंना (पंकजा मुंडेंना) देश आणि जगातील पर्यावरणावर बघावं लागतं. त्यांना बीडबाबत सोयरसुतक राहिलेलं नाही. त्यांना ट्रम्प, बायडन, जर्मनी बाबत विचारत जा," असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे. तसेच पंकजा मुंडेंवर टीका करताना, "संतोष आणि धनंजय तुमचे बूथ प्रमुख होते. त्या इतकं असंवेदनशील बोलतील असं वाटलं नव्हतं," असंही सुरेश धस म्हणाले.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.