Pune Land Controvesry : पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ? CM फडणवीसांचं सूचक विधान; म्हणाले, 'लँड रेकॉर्ड्स...'

Parth Pawar Koregaon Park Land Deal Controvesry : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील भूखंड गैरव्यवहार प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी प्रतिक्रिया देत कारवाईचाही इशारा दिला आहे.   

सायली पाटील | Updated: Nov 6, 2025, 12:55 PM IST
Pune Land Controvesry : पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ? CM फडणवीसांचं सूचक विधान; म्हणाले, 'लँड रेकॉर्ड्स...'
CM devendra fadnavis on Koregaon park land deal controvesry and involvment of dcm ajit pawar son parth pawar

Parth Pawar Koregaon Park Land Deal Controvesry : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव पार्क या उच्चभ्रू भागातील सर्वात मोठ्या भूखंड गैरव्यवहारप्रकरणाचा खुलासा 'झी 24तास'च्या या विशेष वृत्तातून करण्यात आला. ज्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी धुमश्चक्री पाहायला मिळाली. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या Exclusive बातमीवर आपली प्रतिक्रिया देत समोक आलेले मुद्दे अतिशय गंभीर असल्याचं म्हणत कारवाईसंदर्भातील सूचक वक्तव्य केलं. 

Add Zee News as a Preferred Source

काय म्हणाले CM फडणवीस? वाचा जसंच्या तसं...

कोरेगाव पार्क येथील 40 एकर भूखंड गैरव्यवहार आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव पुढे येत असल्यासंदर्भातील प्रश्न विचारला असला मुख्यमंत्र्यांनी लक्षवेधी प्रतिक्रिया दिली. 'या प्रकरणासंदर्भात सर्व माहिती मागवली असून महसूल विभाग असेल, आयजीआर असेल, लँड रेकॉर्ड्स असतील याबाबतची सर्व माहिती मागवण्यात आली असून, यासंदर्भातील योग्य ते चौकशीचे आदेश देण्यात आले असून, ही सर्व माहिती आणि जी प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर सविस्तर माहिती माध्यमांना देण्यात येईल.'

हेसुद्धा वाचा : 'नियम तुमच्यासाठी गुंडाळून ठेवले ना...'; दानवेंचा पार्थ पवारांना टोला; 1800 कोटींचा उल्लेख करत 24 तासांच्या आत आणखी खुलासा

प्रथमदर्शनी जे मुद्दे समोर येत आहेत ते गंभीर असून त्यासंदर्भात संपूर्ण माहिती घेऊनच बोललं पाहिजे असं सांगत आपण त्या दृष्टीनं माहिती मागवली असून त्यासंदर्भात शासनाची दिशा आणि कारवाई काय असेल याची स्पष्टोक्ती लवकरच केली जाईल असं आश्वासक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. 

'उपमुख्यमंत्रीही अशा कोणत्या प्रकाराला पाठीशी घालतील असं...'

'यासंदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कोणत्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही', असं सांगत यासंदर्भात आमच्या सरकारचं एकमत असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. 'ठेही अनियमितता झाली असेल तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशाच मताचे आम्ही आहोत. त्यामुळे निश्चितपणे अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल आणि असं आढळल्यास कडक कारवाई केलीच जाईल', याचाच पुनरुच्चार फडणवीसांनी केला. 

FAQ

कोरेगाव पार्क जमीन व्यवहार विवाद काय आहे?

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव पार्क या उच्चभ्रू भागातील ४० एकरच्या सर्वात मोठ्या भूखंड गैरव्यवहार प्रकरणाचा खुलासा 'झी २४ तास'च्या विशेष वृत्तातून करण्यात आला. या प्रकरणात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे नाव पुढे आले असून, यामुळे राजकारणात मोठी धुमश्चक्री निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणातील मुद्दे अतिशय गंभीर असल्याचे सांगितले. त्यांनी महसूल विभाग, आयजीआर (IGR) आणि लँड रेकॉर्ड्स याबाबतची सर्व माहिती मागवली असून, योग्य चौकशीचे आदेश दिले आहेत. 

फडणवीस यांनी कारवाईबाबत काय सांगितले?

प्रथमदर्शनी समोर येणारे मुद्दे गंभीर असून, संपूर्ण माहिती घेऊनच बोलले पाहिजे असे ते म्हणाले. सरकारची दिशा आणि कारवाई स्पष्ट केली जाईल. अनियमितता आढळल्यास कडक कारवाई केली जाईल. 

 

 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More