'महाविकास आघाडीच्या लोकांना लाजही वाटत नाही, 800 कोटींचा...', निवडणुकांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच सूचक वक्तव्य

बिहारच्या जनतेने मोदी जी यांच्यावर विश्वास ठेवला, विरोधी पक्षाचा सुपडा साफ केला बहुमत मिळाले त्याबाबद्दल बिहारी जनता आभार आणि पंतप्रधान यांचे अभिनंदन केले.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 16, 2025, 01:55 PM IST
'महाविकास आघाडीच्या लोकांना लाजही वाटत नाही, 800 कोटींचा...', निवडणुकांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच सूचक वक्तव्य

कार्यालय रूपाने भाजपचा आज इथं गृह प्रवेश झाला असं म्हणतं, मुख्यमंत्री यांनी रविवारी संभाजीनगरमध्ये कार्यालयाचा गृहप्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधला. तसेच बिहारच्या निकालावर देखील भाष्य केलं. आगामी दिवसांमध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधला. 

Add Zee News as a Preferred Source

बिहारच्या जनतेने मोदी जी यांच्यावर विश्वास ठेवला, विरोधी पक्षाचा सुपडा साफ केला बहुमत मिळाले त्याबाबद्दल बिहारी जनता आभार आणि पंतप्रधान यांचे अभिनंदन केले. सातत्याने जे फेक नारेटिव्ही तयार होताय त्याला जनता उत्तर देतेय, कॉंग्रेस जनतेत येणार नाही जनतेसाठी काम करणार नाही तो पर्यंत त्यांची अशीच माती होईल. वोट चोरी, सह इतर मुद्दे सातत्याने मांडतात मात्र पुरावे मागितले की देत नाही अजूनही सुधारले नाही तर येणाऱ्या निवडणुकीत माती होईल असे भाकीत मी व्यक्त करतो. भाजपच्या वाटचालीत प्रमोद जी गोपीनाथ जी यांचे योगदान आहे पक्षाचे कार्यालय असावे हे ते सातत्याने म्हणायचे, जसे शक्य झाले तसे कार्यालय चालवले.

या कार्यालयाचा उपयोग करून जण सामान्य अडचणी सोडवणे आणि पक्षाचा विस्तार करणे ध्येय ठेवा. संभाजी नगर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडवत आहे. शरद पवार, उबाठा, काँग्रेस च्या इथल्या लोकांना लाज ही वाटत नाही, 800 कोटींचा भर महापालिकेवर टाकलेला  मात्र तो हिस्सा आपण भरला. आंदोलन करणारे लोक हे सरकार आल्यावर महापालिकेने पैसे भरावे म्हणून मागे लागले ले योजना थांबली होती पुन्हा आपली सरकार आल्यावर आपण काम योजना सुरू केली. 

जे लोक आंदोलन करताय हे सगळे लोक खोटारडे आहेत. संभाजी नगरात हजारो कोटींची गुंतवणूक आली हजारो लोकांना काम मिळतंय, देशाचे कॅपिटल संभाजी नगर होईल आम्हाला अभिमान आहे. आणि आपण एनडीआरएफ चे तर पैसे दिलेत पण हेक्टरी दहा हजार रुपये पुन्हा वरचे आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले आणि आता आपले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील त्या ठिकाणी जवळपास 70 टक्के पैसे पोचलेत आणि पुढच्या तीन-चार दिवसात शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात त्या ठिकाणी पैसे पोहोचतील.

आपण एनडीआरएफ चे तर पैसे दिलेत पण हेक्टरी दहा हजार रुपये पुन्हा वरचे आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले आणि आता आपले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील त्या ठिकाणी जवळपास 70 टक्के पैसे पोचलेत आणि पुढच्या तीन-चार दिवसात शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात त्या ठिकाणी पैसे पोहोचतील आणि म्हणूनच

ज्यावेळी कधी नव्हे ते आमचे उद्धवजी मराठवाड्यात दौरा करण्याकरता आले आणि मराठवाड्यात थांबले आणि त्यांनी दौरा केला पण दुर्दैव बघा आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल गावांमध्ये गेल्यानंतर माणसंच नसायचे आमचे अंबादास दानवे माणसाने कुठे गेले अरे माणसाला अरे माणसा आणा असे माणसे आणायचे याचं कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही लोकांना माहिती आपत्तीमध्ये ही भारतीय जनता पार्टी महायुतीच त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय की आता या कार्यालयाचे उद्घाटन झालेलं आहे

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चाललेले आहेत आता नगरपालिकेच्या निवडणुका आहेत मग जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या आहेत या सगळ्या निवडणुकांमध्ये आपल्याला प्रचंड विजय मिळवायचाय मगाशी अध्यक्ष म्हणाले मी अध्यक्षला एवढंच सांगू इच्छितो जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला महायुती करायची आहे जिथे शक्य नाही तिथे आपण करू शकणार नाही. पण एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या ठिकाणी आपली महायुती जरी झाली नाही तरी आपल्यासमोर लढणारे पक्ष आपले मित्र पक्ष आहेत ते आपले शत्रू नाहीयेत विरोधकही नाही आहेत ते आपले मित्र पक्ष आहेत हे आपण लक्षात ठेवूनच या ठिकाणी ही लढाई करायची आहे त्यामुळे पुढच्याही काळामध्ये या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जो काही या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या संस्थेमध्ये जो कोणी सत्तेवर येईल तो महायुतीचाच असला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा तुमच्यामुळे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या महिन्यातील भाजपच नंबर एकचा पक्ष असेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो.

या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जो काही या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या संस्थेमध्ये जो कोणी सत्तेवर येईल तो महायुतीचाच असला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा तुमच्यामुळे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या महिन्यातील भाजपच नंबर एकचा पक्ष असेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या कार्यालयाकरिता ज्यांनी ज्यांनी मेहनत केली त्या सगळ्यांचं अभि अभिनंदन करतो

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More