औरंगाबाद : महापालिकेतल्या काँग्रेसच्या एका नगरसेवकाच्या वाढदिवसाला अक्षरशः लाखो रुपयांची उधळण करण्यात आली. अफसर खान नावाचा हा नगरसेवक वाढदिवसानिमित्त अमिताभच्या 'मै हू डॉन' या गाण्यावर थिरकला आणि कार्यकर्त्यांनी या नगरसेवकावर नोटांची उधळण केली. 


वाढदिवसाला अक्षरशः लाखो रुपयांची उधळण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला शहरातल्या प्रतिष्ठित लोकांसोबतच काही पोलीस अधिकारी, काँग्रेसचे आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारीही उपस्थित होते. 



अफसर खानच्या वाढदिवसासाठी रस्त्यावर स्टेज उभारण्यात आला होता. त्याठिकाणी मनोरंजनाचा कार्यक्रम सुरु होता. त्याच ठिकाणी नगरसेवक अफसर खान महाशय आले आणि त्यांनी गाण्यावर ताल धरला.


साहेबांना खूश करण्यासाठी त्यांच्यावर नोटांची उधळण


तेव्हा तिथे उपस्थित त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या साहेबांना खूश करण्यासाठी त्यांच्यावर नोटांची उधळण केली. वाढदिवस कसा साजरा करायचा हा अफसर खान यांचा खासगी प्रश्न आहे. मात्र अशा पद्धतीने नोटांची उधळण करणं कितपत योग्य आहे हाही प्रश्न आहे.