Pune Koregaon Park Land Deal Case: जमीन गैरव्यवहार प्रकरणात विजय वडेट्टीवारांनी गंभीर आरोप केला आहे. तसंच या प्रकरणात संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सत्य समोर आल्यानंतर योग्य कारवाई केली जाणार असल्याचं शिरसाटांनी म्हटलं आहे.
पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरण झी 24 तासनं समोर आणलं आहे. झी 24 तासनं दाखवलेल्या बातमीनंतर या प्रकरणात कारवाईची मागणी केली जाते. महार वतनाची सरकारच्या ताब्यात असणारी जमीन ही 300 कोटी रूपयांना पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं खरेदी केली. मात्र, हा व्यवहार 300 कोटींचा नसून एक लाख कोटींचा असल्याचा आरोप काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी केला आहे.
1 लाख कोटींचा घोटाळा, कडक कारवाई करावी
व्यवहार तातडीनं रद्द केले पाहिजेत- विजय वडेट्टीवार
दरम्यान या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी देखील विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसंच संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील या जमीन प्रकरणावरून नाव न घेता अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.
झी 24 तासनं हिंमत दाखवली, व्यवहार रद्द करा, कारवाई करा
आपण सर्व हक्कासाठी भांडतोय, यांची मुलं जमीन लाटत आहेत
झी 24 तासच्या बातमीचा दणका, कारवाईला वेग - H))
दरम्यान शासनाकडे असलेली जमीन विकली कशी? असा प्रश्न खुद्द सत्ताधा-यारी नेत्यांनाच पडलाय.. तसंच या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून सत्य समोर येणार
असल्याचं संजय शिरसाटांनी म्हटलं आहे. तर महाराष्ट्रात भ्रष्टाचारी सरकार अस्तित्वात असल्याची टीका सतेज पाटलांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, त्यातून समोर येईल
महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारी सरकार, सत्ताधारी जमिनी बळकावतायत))
पार्थ पवारांनी खरेदी केलेलं जमीन प्रकरण झी 24 तासनं समोर आणलंय.. झी 24 तासच्या बातमीनंतर खळबळ उडाली असून कारवाईला देखील वेग आला आहे. हे प्रकरण केवळ 1800 कोटींचं नसून याच्यात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला आहे. तसंच जमीनाचा व्यवहार रद्द करण्याची मागणी देखील विरोधकांकडून करण्यात आली आहे.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.