मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा, महाविकास आघाडी अनभिज्ञ?

मुंबईत काँग्रेसनं स्वंतत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर मविआत आलबेल नसल्याचं चित्र आहे.  

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 16, 2025, 10:01 PM IST
मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा, महाविकास आघाडी अनभिज्ञ?

Congress : मुंबईत काँग्रेसनं स्वंतत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर मविआत आलबेल नसल्याचं चित्र आहे. कारण काँग्रेसनं याबाबत पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा केली नसल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय. तर दुसरीकडे मनसेमुळे काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे मनसेनं बिहार निवडणुकीत काँग्रेसनं केलेल्या कामगिरीनंतर टोला लगावलाय. त्यामुळे मनसे आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपलीय. पाहुयात

Add Zee News as a Preferred Source

काँग्रेसनं मुंबईत स्वबळाचा नारा दिल्यानंतर मनसे आणि काँग्रेसमध्ये जुंपलीय. मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंनी काँग्रेसला टोला लगावला होता. दरम्यान यानंतर आता काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी देखील मनसेवर पलटवार केलाय. मनसे मविआतील घटक पक्ष नसून त्यांना काँग्रेसबद्दल बोलण्याचा अधिकार नसल्याची खोचक टीका विजय वड्डेवारांनी केलीय.

काँग्रेसनं मविआतील घटक पक्ष पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा केली नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय. दरम्यान या मुदद्यावर चर्चा करून काँग्रेसची संपर्क साधणार असल्याचं देखील जयंत पाटलांनी म्हटलंय. तर उद्धव ठाकरेंनी देखील काँग्रेसच्या निर्णयावर टीका केलीय.

काँग्रेसची मुंबईत स्वबळाची घोषणा

ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत. अद्याप युती झाली नसली तरी दोन्ही बंधू पालिका निवडणुकीच्या मैदानात एकत्र उतरणार असल्याचं जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा मविआतील सहभाग देखील निश्चित मानला जात आहे. त्यामुळे पालिका निवडणुका कशा लढायच्यात याचा निर्णय मविआतील घटक पक्ष चर्चा करून घेतील अशी दाट शक्यता होती. मात्र, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी थेट मुंबईत स्वतंत्र लढण्याची घोषणा शनिवारी करून टाकली.

आजही काँग्रेसची मुंबईतील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. दरम्यान या बैठकीत मुंबई पालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला. वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून ही माहिती दिलीय.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या विविध कमिटीच्या पदाधिकाऱ्याबरोबर आज बैठक घेतली. या बैठकीत मुंबईतील महत्वाचे नागरी प्रश्न, मुंबईकरांच्या समस्या त्याबाबत काँग्रेस कडून केली जाणारी आंदोलनं याबाबत चर्चा झाली. जास्तीत जास्त मुंबईकरांपर्यंत काँग्रेस पोहोचली पाहिजे यासाठी आगामी कळत विशेष प्रयत्न केले जाणार. 

पालिका निवडणुकीच्या घोषणेआधीच काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय. ठाकरे बंधू काँग्रेससोबत मुंबईत निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सकारात्मक असल्याचं खुद्द संजय राऊतांनी सांगितलं होतं. मात्र, मनसे आणि ठाकरेंची शिवसेना मुंबईत एकत्र लढणार असल्याच्या कारणानेच काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More